हे आपणास माहीत आहे का ?? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
हे आपणास माहीत आहे का ?? लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ जुलै, २०१२

लेहेरोनसे से डर कर नौका पार नाही होती , हिम्मत करणे वालोंकी हार नाही होती ,

ऑस्कार पिस्तोरीओउस (Oscar Pistorius ) ... ह्या दोन्ही पायाने अपंग असलेल्या साउथ आफ्रिकन धावपटूला लंडन olympics ४०० मीटर्स व ४०० x ४ मीटर्स ह्या स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे...वयाच्या पहिल्याच वर्षी जर्जर आजाराने दोन्ही पाय गमवून बसलेल्या ऑस्कार ने हिम्मत न हरता आपली वाटचाल कृत्रिम पायाच्या सहायाने अत्यंत धैर्याने व कणखरपणे सहनशीलतेने पार केली.. दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्याने अनेक स्पर्धात धडधाकट प्रतीस्पर्द्याना धूळ चारत चार सुवर्ण पदके व एक जागतिक विक्रम आपल्या नावावर करत एक नवा अध्याय लिहिला ..
आता हा जिगरबाज धावपटू आता लंडन ओल्य्म्पिच्स मध्ये धावणार आहे..त्यासाठी त्याला सुभेच्या व त्याच्या या जिगरबाज वृतीला सलाम...सलाम ऑस्कार पिस्तोरीओउस

सोमवार, २५ जुलै, २०११

हे आपणास माहीत आहे का ??


* ..की खग्रास सूर्यग्रहणाच्या वेळी तापमान ६ अंशांनी कमी होते ?

हत्ती
...
* ...की आफ्रिकेतील हत्तींना अन्न चावण्यासाठी फक्त चारच दात असतात ?

शार्क

* ...की शार्क माशांना माणसाला माहीत असणारा कुठलाही आजार होऊ शकत नाही ?

सूर्य

* ...की सूर्य हा पृथ्वीपेक्षा ३,३०,३३० पट मोठा आहे ?

पत्ते

* ...की पत्त्यांतील चारी राजे ही पूर्वीच्या खर्‍या राजांची चित्रे आहेत ?

जिराफ

* ...की जिराफांची जीभ ५० से.मी. लांब असते व त्याने जिराफ आपले कान साफ करतात ?

जग

* ...की जगातील सर्व खंडांची इंग्रजी नावे ज्या अक्षराने सुरु होतात त्याच अक्षराने संपतात ?

दिवा

* ...की थॉमस अल्वा एडीसन अंधाराला घाबरत असे ?

शिंक

* ...की माणूस डोळे उघडे ठेवून शिंकू शकत नाही ?

गणित

* ...की १११,१११,१११ X १११,१११,१११ = १२,३४५,६७८,९८७,६५४,३२१ ?

झुरळ

* ...की झुरळे डोक्याविना ९ दिवस जीवंत राहू शकतात ?

फुलपाखरु

* ...की फुलपाखरे आपल्या पायांनी चव घेतात ?

ध्रुवीय अस्वल

* ...की सर्व ध्रुवीय अस्वले ही डावखोरी असतात ?

मगर

* ...की मगर आपली जीभ तोंडाच्या बाहेर काढू शकत नाही ?

कोळी

* ...की सर्वसाधारणपणे माणूस कोळ्याला जितका भीतो तितका मरणाला भीत नाही ?

जीभ

* ...की शरीरातील सर्वात ताकदवान स्नायू म्हणजे जीभ ?

हत्ती

* ...की हत्ती हा एकच असा प्राणी आहे की जो उडी मारू शकत नाही ?

हृदय

* ...की हृदयात १० मी. पर्यंत रक्त फेकण्याची ताकद असते ?

भोलू-भारतीय रेल्वेचा शुभंकर

* ...की भारतीय रेल्वे जगातील सर्वात जास्त रोजगार देणारा उपक्रम आहे ?
* ...की महाराष्ट्र राज्यापेक्षा जास्त लोकसंख्या (९,६७,५२,२४७) असणारे जगात केवळ ११ देश आहेत ?

युरो-चलन

* ...की युरोपियन संघाचे अधिकृत चलन 'युरो' हे युरोप खंडातील १३ देशात वापरले जाते ?

भारताचा ध्वज

* ...की भारतात २२ शासकीय राजभाषा आहेत पण एकही राष्ट्रभाषा नाही ?

बृहन्मुंबई महानगरपालिका .

* ...की १८७३ रोजी स्थापन झालेली बृहन्मुंबई महानगरपालिका भारतातील पहिली स्थानिक स्वराज्य संस्था आहे ?