छावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
छावा लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १२ जुलै, २०१२

छावा

मनगटा मधे एवढे बळ कि तलवारीच्या एक घावात मनुष्य काय अश्वाचे पण दोन तुकडे पडतील , भरदार शरीरयष्टि ,वाघाची आक्रमकता आणि अद्वितीय युद्ध कौशल्य ह्याचे धनि म्हणजे छत्रपति संभाजी राजे. शम्भू राजे हे अटकेपार महाराष्ट्र राज्य वाढवणारे महान योद्धे.२४ नोव्हेंबर १६८३ रोजी जुवे बेटावर फिरंग्यांचा शंभू राजांच्या सैन्याकडून दारूण पराभव झाला होता. ह्या नंतर गोवा जवळ पास मराठी साम्राज्यात आले होते. राजकीय आणि पारिवारिक कलह सहन केलेले शंभू राजे हे त्या वेळी एकटेच ४-५ साम्राज्यांशी समर्थपणे लढत होते. त्याचे पराक्रम आणि युद्ध कौशल्य हे त्यावेळी सर्वात उत्कृष्ट दर्जाचे होते म्हणून कि काय औरंगजेब त्यांना फितूरी करुनच पकडू शकला आणि ह्या नंतर एक योद्धे ते इतिहास वीर हा त्यांचा प्रवास सुरु झाला. जसा महाभारतामध्ये कर्ण होता , जो सर्व गुण सम्पन्न असून पण शेवट कौरव मित्र म्हणून स्वतः वर एक डाग लावून गेला तसे काही शम्भू राजांच्या बाबतीत आयुष्याच्या सुरुवातीस झाले असे म्हणता येइल. पण इतिहासामधे आपला मृत्यु जगणारे जर कोणी असतील तर त्यात पृथ्वीराज चौहान आणि छत्रपती संभाजी राजे हे अग्रस्थानी आहेत. छत्रपति शिवरायांच्या प्रभावशाली राज्याच्या शेवटी मराठा साम्राज्यात आलेली मरगळ आणि संभ्रमता ही शम्भू राजे ह्यांच्या बलिदानाला पाहून क्षणात निघून गेली आणि स्वराज्यात एक चैतन्य निर्माण करून गेली. जसे पर्वतावर पाणी,हवा सतत आदळत असते पण पर्वत हां स्थिर असतो तसे शम्भू राजे हे औरंगजेबा समोर आपल्या मृत्युसमयी स्थिर होते. त्यांच्या शरीराला जहाल वेदना देणारे मुघल हे त्यांच्या आत्म्याला त्रास देण्यास सपशेल अपयशी ठरले आणि मृत्युस प्राप्त ठरून पण औरंगजेबा समोर शम्भुराजेच जिंकले. ह्या मराठी मातीचा शंभूराजे हा एक चमत्कार होता त्याना विनम्र अभिवादन ..

बुधवार, ११ जुलै, २०१२

तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुर्विचे नाव 'नांगरवास'. त्याला तुळापूर हे नाव कसे पडले त्याचा इतिहास आहे.

इतिहास - शहाजी राजे
आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ
इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर
नांगरगावी पडला होता.मुरार जगदेवास
आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण
एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल
मात्र काही केल्या त्याला होईना .मग
शहाजीराज्यांनी पुढं होऊन त्याला तोड
सांगितली.हत्तीच
ा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील
डोहाच्या नावेत चढविण्यात आला.त्या वजनाने
नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खुण करून
घेतली.मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव
डूबेल एवढे दगड धोंडे नावेत चढविले
आणि त्या दगडांच्या भाराइतक सोनंनाणं दान
करण्यात आलं.तेव्हापासून त्या 'नांगरवासास'
'तुळापूर' म्हणतात.
तुळापूर हे गाव भीमा,
भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर
वसले आहे. तुळापुर आळंदी पासून साधारण १४
किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर
आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
वढू बुद्रुक आणि तुळापूर
भीमा नदीतीरावरची पवित्र स्थळे . या दोन
गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. हीच
ती भूमी जिथे संभाजी महाराजांवर अंतिम
संस्कार झाले. औरंगजेबाने ज्या क्रुरतेने
संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे
तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले,
त्या सर्व इतिहासाची साक्षीदार हि भूमी.
नकळत इतिहासात घेऊन जाणारी हि भूमी
वढू बुद्रुक आणि तुळापूर
या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे.
औरंगजेबाने
जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे
इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक
मराठी माणूस हादरून गेला.
संभाजी राजांचा अंतिम संस्कार रीतीने
व्हायला पाहिजे आशेच सर्वाना वाटत होते. वढू
च्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव
धोक्यात घालून, भीमा ओलांडून
आणि मुगली सैन्याला चकवून
त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे
गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला.
असेच तुळापूरलाही घडले.
वढू पासून तुळापूर ५-६ किमी अंतर. रम्य
हिरवा परिसर. तुळापूर
ची संभाजी महाराजांची समाधी हि भीमा –
भामा – इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर. तिथे
बरीच मंदिरे आहेत आणि पुरातन संगमेश्वर मंदिर
तर देखणं आहे. त्रिवेणी संगमावरचा निसर्ग, घाट
पाहण्यासारखा आहे.
इतिहास आणि पर्यटन या दोहोंचा इथे सुरेख
मिलाप झालाय ...... पराक्रमाने , शौर्याने
पावन झालेली हि भूमी आहे. शिवपुत्र
संभाजीची हि भूमी आहे

संताजी घोरपडे


संताजी घोरपडे हे मराठा साम्राज्याचे (१६८९ ते १६९७) सरसेनापती होते. संभाजी महाराजांच्या मृत्यूनंतर मराठ्यांच्या स्वातंत्र्यलढ्याची धूरा वाहिली. संताजी घोरपडे हे नाव धनाजी जाधव यांच्यासोबत मराठेशाहीत घेतले जाते. या दोघांनी मिळून अत्यंत दीर्घ काळ (१७ वर्षे) औरंगजेबच्या बलाढ्य सेनेचा सामना केला,मुघल सैनिकां मध्ये संताजी आणि धनाजी यांची प्रंचड दहशत होती. सार्वत्रिकरीत्या मुघल छावण्यांवर हल्ले हे यांच्या युद्धनीतीचा भाग होते. अत्यंत नाजूक पडत्या काळात मराठ्यांचे स्वराज्य नष्ट होण्यापासून वाचवले व जसजसे औरंगजेचा प्रतिकार क्षीण होत गेला तसतसे नंतर धनाजींनी स्वराज्य पसरवण्याचे धोरण अवलंबले. १७०७ मध्ये औरंगजेबच्या मृत्यू समयी मराठ्यांनी मध्य भारतापर्यंतचा भूभाग स्वराज्यात आणला होता. शिवाजी महाराजांनी स्थापिलेल्या स्वराज्याला संताजी व धनाजी यांनी वाचवले व पसरवले. मराठ्यांनी १८ व्या शतकात जवळपास संपूर्ण भारतावर आपला दरारा निर्माण केला. त्यांच्या एका मोहिमेचा हा किस्सा .......

शंभूराजानंतर राजाराम महाराजांनाही आता औरंगजेब वाट मोकळी करत नव्हता त्यामुळे पन्हाळ्या वरूनच राजाराम महाराज राजकारभार पाहत होते. सर्व मराठा मावळ्यांमध्ये एक शल्य होते आणि ते म्हणजे संभाजी महाराजांसाठी काहीच करू शकलो नाही ,मनात ठासून राग भरला होता पण याला पर्याय काय ? कोण घेणार पुढाकार ? कोण राखणार स्वराज्य ? कोण राखणार शिवरायांची शान ? कोण मिळवून देणार मावळ्यांचा आत्मविश्वास ? आणि याचा उद्रेक शेवटी होणार तो झालाच.मराठा सरदारांच्या गुप्त बैठका सुरु झाल्या.. कसे उट्टे काढायचे ? कसा बदला घ्यायचा ? त्या औरंग्याची दात घशात कशी घालायची ? कसे दाखवायचे मराठ्यांचे सळसळते रक्त ? कोण येणार पुढे ? गुप्त सल्लामसलतीमध्ये आघाडीवर होते संताजी घोरपडे आणि धनाजी जाधव, सोबतीला संताजींचे दोन बंधू बहिर्जी आणि मालोजी सोबत विठोजी चव्हाण तसेच आणखी काही शूर सेनानी..या गुप्त बैठकीत धाडसी बेत ठरला कि औरंग्याला त्याचाच छावणीत घुसून लज्जित करायचा..त्याचा पाडाव करायचा.

त्यात सोन्याहून पिवळी एक गोष्ट म्हणजे शंभूराजांचा बदला तुळापुर येथेच करायचा कारण औरंग्या इथेच होता.. (तुळापुर जिथे संभाजीराजांना मारण्यात आले) चर्चा झाली.. निर्णय ठरला.. धनाजीरावांकडे पाहत संताजी घोरपडे म्हणाले “खानाचा माज तुम्ही जिरवा फलटणला आणि मी खुद्द २००० निवडक मावळ्यान्सोबत औरंग्याला मराठ्यांचा रुद्रावतार दाखवितो, दाखवितो मराठे आजही आहेत.. तुमास्नी आसमंत दाखवायास”या निर्णयावर शिक्कामोर्तब करणे इतके सोपे नव्हते परंतु संताजींनी सर्व मोहीम नियोजनबद्ध आखली,

दस्तुरखुद्द संताजींनी एका एका मावळ्याला प्रत्यक्ष भेटून त्याचा जोश वाढविला आणि प्रसंगी संयम राखण्याचा सल्ला दिला.. हळूहळू संताजींची हि तुकडी तुळापुरकडे कूच करू लागली, औरंग्याला त्यावेळी विचारसुद्धा नव्हता कि अशी त्याची वाट मावळे लावतील,भयान अंधारातून पायवाट काढली जाऊ लागली, झाडाझुडपाचा, पालापाचोळ्याचा आणि रातकिड्याचा आवाज कानी घुमू लागला.. तुळापुर जसजस जवळ येत होत तसतस मुघलांची घुबड दिसू लागली.रात्रीची भयाण शांतता तुळापुरभोवती पसरलेली होती.. त्यावेळेस काही मराठी लोकांच्या फौजही औरंग्याकडे होत्याच त्यामुळे मुघल सैन्याला वाटले आपलीच माणसे असतील……. आणि नेमका याच गोष्टीचा आणि या अंधाराचा फायदा घेत मावळ्यांची तुकडी थेट औरंग्याच्या छावणीत घुसली,काही कळायच्या आतच मावळ्यांनी “हर हर महादेव” चा जयघोष करत आणि “जय भवानी, जय शिवाजी” या नावाने मोघलांची अक्षरशः कत्तलच सुरु केली शीर धडावेगळे होत होते, कुठे नुसती रक्ताची चिळकांडी दिसून येत होती.औरंग्यासोबत अख्खी त्याची लाखोंची सेना भांबावून गेली होती, या अवस्थेत ते स्वतःच्याच सैन्यासोबत युद्ध करू लागलेबरगडीत मराठ्यांच्या तळपत्या तलवारी घुसून बाहेर पडू लागल्याने तडफडत जीव सोडू लागले.एकच हल्लकल्लोळ सुरु झाला परंतु तरीही संताजींचा एक मनोदय फसला तो म्हणजे औरंग्याला भुईसपाट करायचा अंगरक्षकांनी अक्षरशः पळवूनच नेले त्याला..

जेवढे प्रचंड नुकसान करता येईल तेवढे करत करत शेवटी औरंग्याचा तंबुच उखडून टाकला.. औरंग्याचा डेरा भुईसपाट करून त्याचा सुवर्ण कलश निशाणी म्हणून घेऊन संताजींनी मावळ्यांना माघारी फिरण्याचा आदेश दिला.याअगोदर कि औरंग्याची सेना तयार होईल छोट्या छोट्या तुकडीत विभागून संताजींनी मावळ्यांना शेवटी मोहीम सिंहगडाकडे कूच करण्याचा आदेश दिला…. मोहीम फत्ते झाली होती..
 — 

मंगळवार, ५ जून, २०१२

शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता



राजा शिवाजी हा निर्विवाद सिंहपुरुष होता. परंतु शिवपुत्र संभाजी हाही एक छावाच होता. महाराष्ट्राला हे नव्यानं पण पुरेपूर उमजलं आहे. 'छावा'च्या जोरदार स्वागतानं तर हे सिद्ध झालं आहे.
एक दोनच नव्हे तर एकाच वेळी पाच आघाड्यांवर निकराची पंजेफाड करणारा हा सेना-धुरंदर! मराठ्यांच्या इतिहासात नवा सेनापती एकमेव संभाजीच होऊन गेला. जंजिरेकर सिद्धी, गोव्याचे फिरंगी, मुंबईचे टोपीकर आणि तीन लाखाची फौज व चौदा कोटींचा खजिना घेऊन मराठ्यांचे पारिपत्य करण्यासाठी दक्षिणेत उतरलेला अवाढव्य औरंगजेब. या त्या चार आघाड्या. पाचवी आघाडी होती स्वार्थांध स्वजनांची, अगदी घरचीच! विखारी विश्वासघातक्यांची!
रणांगणाचा सत नऊ वर्षे पाठीशी घेत मुलुखभर दौडणारा हा झुंजार राजा जन्माला येतांना कविमनाचे संचित बरोबर घेऊन यावा आणि 'बुधभूषणम' काव्याची रचना करून तो कविराज म्हणून मान्यता पावावा हे पाहिले की प्रतिभा देवदत्त असली तरी एक अजब व विस्मयकारी देणगी आहे असे म्हणावे लागते. तसाच अटीतटीचा प्रसंग आला तर मराठी कविमन एकदा का निर्धाराने राजवस्त्र ल्यायले की मृत्यूलाही कसे धडक सामोरे जाऊ शकते, हे छाव्याने तुळापुरी सिद्ध केले. ही शोकांतिका खरीच पण उत्कट आणि भव्य समर्पणाचा वेध घेणारी!