शिवाजीराजे भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शिवाजीराजे भोसले लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २५ जुलै, २०१२

असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..

असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मि राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे करण्याची..
औरंग्या तुझी औकात नाही मराठ्यांना पराभुत करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखा पाहुन भगव्या रक्ताचा..
तु काय आम्हाला धाक दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहे तोच आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात आमच्या आग आहे..
लांडग्याची जात तुझी
मि सह्यांद्रिचा वाघ आहे.

जय जिजाऊ....!!
जय शिवराय....!!
जय शंभु राजे....!!

रविवार, २२ जुलै, २०१२

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस..

भारतासारख्या महाकाय देशात उत्तरेकडून येणार्‍या हजार वर्षाच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देणार्‍यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे एकमेवाद्वितीय स्थान आहे तेच स्थान गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रालाशिवगाथा सांगणार्‍यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आहे. महाराष्ट्राला आज शिवाजी महाराज माहीत आहेत त्यात बाबासाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली साठ वर्षे बाबासाहेबांनी एकच ध्यास सांभाळला आहे तो म्हणजे महाराष्ट्रा तील सामान्य माणसाच्या जीवनात शिवाजी महाराजांचे आदर्श आले पाहिजेत. दहा हजार भाषणे आणि ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाची काही लाखाच्या अनेक आवृत्या असा पल्ला बाबासाहेबांमी गाठला याच्या मुळाशी शिवचरित्राचा भाव जागा करण्याची अतिशय उत्कट अशी उर्मी हे एकमेव कारण होय. शिवकालाच्या पूर्वी एक हजार वर्षे उत्तरेकडून येणारे आक्रमण थोपविण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण त्यातून यशोगाथा उभ्या राहण्याऐवजी हौतात्म्यगाथाच उभ्या राहिल्या. त्यामुळे शिवचरित्र हा केवळ सनावळ्यांचा इतिहास नसून ती युगायुगातून उभी राहणारी राष्ट्रउभारणीची संहिता आहे. आणि बाबासाहेबांचे वैशिष्ठ्य असे की, १९५०च्या काळात पोटापाण्यासाठी त्या काळी शक्य असणारे भाजी विक्री, पुस्तकविक्री, मास्तरगिरी, भडजीगिरी, प्राध्यापकगिरी हे सारे पर्याय बाजूला ठेवून त्यांनी शिवचरित्र कथन करण्याचे ब्रीद घेतले. त्यातून पोटापुरते मिळवण्याचे ध्येय बाजूला राहो पण त्यातून मिळणारी भाषणमालेची बिदाग्यांची सारी रक्कम शिवसृष्टी उभारणीसाठी राखून ठेवली त्यातून अशा स्वरुपाचे काम करणार्‍या अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि आता प्रत्यक्ष शिवसृष्टीही उभी राहात आहे. बाबासाहेबांना जबरदस्त सामर्थ्याची स्मरणशक्ती आणि असामान्य वक्तृत्व यांची देणगी असल्याने संसाराला लागणारा चांगला व्यवसाय करण्यासाठी चांगली प्राप्ती मिळणारे अनेक व्यवसाय उपलब्ध झाले असते पण तो रस्ता सोडून त्यांनी शिवशाहीरीचा बिकट रस्ता स्वीकारला आणि अनेक अग्नीदिव्यातून बाहेरपडून आज प्रचंड मोठे काम केल्याची कृतकृत्यता त्यांच्या जमेच्या खात्यावर आहे.

पु ल देशपांडे यांनी म्हटलय, ‘जगण्यासाठी माणसाला फार महत्वाची गोष्ट मिळावी लागते ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. बाबासाहेबांना हे प्रयोजन वयाच्या १६व्या, १७व्या वर्षीच गवसल. ते म्हणजे शिवचरित्र लिहिण्याच. हे प्रयोजन सापडल्यावर पुढील्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका मास्तरच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या स्थितीत त्यांचा जीवनप्रवास सुरु आहे व सुरुच राहणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. पण त्याच्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधाने करायची नाहीत अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. अंतःकरणातला कवि मोहोरबंद ¬- गडेदार भाषा लिहितो पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही. वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.हा इतिहासकार भूतकाळाइतकाची वर्तमानाशी जुळलेला आहे.’ पु.ल.देशपांडे यांनी बाबासाहेबांचे जे अचूक शब्दचित्र रंगवलय ते समर्पक आहे.
आज नव्वदाव्या वर्षी बाबांचा उत्साह अक्षरशः तरुणांना लाजवणारा आहे. अजूनही त्यांना तीन हजार पानांचे शिवचरित्र लिहायचे आहे व त्याची तयारी सुरु आहे त्यातूनच अनेक पुस्तके होणार आहेत त्याच प्रमाणे दुसर्‍या बाजूला शिवसृष्टी उभे करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बरेचसे काम पूर्णही झाले आहे. शिवाय दररज कोठे ना कोठे कोणत्या तरी महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवचरित्राचे पैलू पुढे येतच असतात. त्यांच्या त्या प्रेरक उत्साहाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांनी ही सारी तयारी कशी केली याची ते जेंव्हा मनोरंजन हकिगत सांगतात तेंव्हा आश्चर्य वाटते.साठ वर्षापूवीं सारा विदर्भ बाबासाहेबांनी राजाभाउ देशपांडे यांच्या बरोबर पिजून काढला आहे. अजूनही राजाभाउंची आठवण निघाली की बाबासाहेब अतिशय दुःखी होतात.


बाबासाहेबांचा कुंडलीवर विश्वास आहे की नाही पण कुंडलीत विशोत्तरी महादशा नावाची एक चितनशैली आहे. प्रत्येकाने भक्कमपणे काम करत एकशेवीस वर्षे जगावे अशी अपेक्षा त्यात व्यक्त झालेली असते. शिवचरित्राच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी बाबासाहेबांना एक विशोत्तरी मिळावी ही सर्व गृह आणि तारे यांच्या चरणी प्रार्थना....


शनिवार, ७ जुलै, २०१२

जय शिवराय


आम्ही एकदाचबोलतो,


नाहीऐकल तरजित्तच फाडतो.


आम्हीकधी घाबरत नाही.


पाचपाऊल मागे सरकुनकापल्याशिवाय राहतनाही.
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
 

रविवार, १७ जून, २०१२

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथी [१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४] विनम्र आभिवादन.



स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू. स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग. 

त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते.
आज जिजाऊ साहेबांना जाऊन ३०० पेक्षा ही अधीक वर्षे झाली, पण विचारांनी जिजाऊ साहेब आपल्यातच आहेत. त्यांच्याच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी बळ दिले आणि जिजाऊ.कॉम हा संकल्प मे २००९ मध्ये साक्षात आला. अगदी प्रकल्प वेब वर जाताच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हात घेतलेले कार्य फक्त दोघांना पेलवणारे नाही हे जाणवले. मदतीसाठी हाक दिली आणि बघता बघता महाराष्ट्रभरातून अनेक जणांचे हात मदतीसाठी धावून आले. माहितीची भर पडली आणि पुन्हा माहितीची अपेक्षा ही वाढली. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून खेड्या-पाड्यातून फोन येऊ लागले. माहिती साठी आसुसलेला आणि माहिती नसल्यामुळे काही अंशी मागे पडलेला महाराष्ट्र कानाने ऐकला आणि डोळ्यांनी वाचला. म्हणूनच पुन्हा नवीन स्वरुपात जिजाऊ.कॉम आणण्याचा विचार झाला. आणि आज, त्या नवीन स्वरुपासाहित, जिजाऊ.कॉम आऊसाहेबां चरणी अर्पण करत आहोत.
राष्ट्राच्या काना कोपऱ्यात, खेड्यात, शहरात अनेकजण या ना त्या प्रकारे राष्ट्रनिर्माणासाठी काही ना काही करत आहेत. काही लोक संघटीत होऊन झुंज देत आहेत तर काही लोक एकटेच. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला (कृपया कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ती ही वाचा) जिजाऊ.कॉम हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. धर्म, जात, पक्ष आणि वर्ग विरहित चळवळीचे एक माहेरघर आहे. अनेक प्रश्नांनी लादलेली आपली डोकी कुठे तरी रिकामी करायची असतील, जाचक व्यवस्थेबद्दल आवाज उठवायचा असेल किंवा मग एखादया विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर जिजाऊ.कॉम हे प्रत्येक कार्यकर्त्याचे हक्काचे ठिकाण व्हावे हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न.
आऊ जिजाऊ च्या नावे चालणारी ही चळवळ आपल्या सगळ्यांना राष्ट्रानिर्मानात मार्गदर्शन करत राहो हीच आऊसाहेबां चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या माउलीला, आऊ जिजाऊला, राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन.
जय जिजाऊ. 

गुरुवार, ७ जून, २०१२

ईतिहासाचा राजा.. फक्त छत्रपति माझा..



ईतिहासाचा राजा..
फक्त छत्रपति माझा..
आम्हाला फक्त तुझ्या
जयजयकाराची भुक..
फितुराना घेतल डोक्यावर हिच
मराठ्यांची मोठी चुक..
राजकीय सोंग सारी कोण कोणाला
मानतो..
ते
शिवाजी महाराज कि
म्हणतात आम्ही फक्त
जय
म्हणतो..
विचार करा मराठ्यानो हे
उष्ट्या पात्रवळ्यावरचे उष्टे
द्रोण..
कळत नाहीकारे रक्ताची नाती
अन
फितुर कोण..
आरे
आठवा त्या शंभुला ज्यान औरंग्या
जरजर केला..
तोच
छत्रपति शंभु ज्यांचा यांच्याच
बापजाद्यानी घात केला..
म्हणुन जिंकता नाही आले
या दुनियेला..
अजुनही वेळ गेली नाही..
वाघांची संख्या कमी झाली नाही..
आज जे दिसतय ते मराठ्यांच्या
बरबादिचे दृष्य आहे..
सुधरुन घ्या तुमच्या हातात
उद्याच्या मराठ्यांचे
भविष्य आहे..

जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे......!!

शुक्रवार, ९ सप्टेंबर, २०११

शिवाजीराजे भोसले

नाव : शिवाजी भोसले
अधिकाराकाळ : ०६.०६.१६७४ -०३.०४.१६८०
राज्याभिषेक :०६.०६.१६७४
राज्यव्याप्ती : पश्चिम महाराष्ट्र, कोकण,सह्याद्री डॊंगररांगांपासून नागपूरपर्यंत आणि उत्तर महाराष्ट्र, खानदेशापासूनदक्षिण भारतात तंजावर पर्यंत .
राजधानी : रायगड
... जन्म : १९.०२.१६३० शिवनेरी किल्ला, पुणे
मृत्यु : ०३.०४.१६८० रायगड
उत्तराधिकारी :संभाजीराजे
वडिल : शाहजीराजे
आई : जिजाबाई
पत्नी : सईबाई, सोयराबाई, पुतळाबाई, काशीबाई, सकवारबाई, गुणवंताबाई,लक्ष्मीबाई & सगुणाबाई
राजब्रीदवाक्य : 'प्रतिपच्चंद्रलेखेव वर्धिष्णुर्विश्ववंदिता शाहसुनोः शिवस्यैषा मुद्रा भद्राय राजते।'
चलन: होन, शिवराई