..आयुष्याची वाट चालूया सगळ्यांनी मिळूनी , जातील दुखे जळूनी ,जाईल तो त्रासही पळुनी , जेव्हा होईल जड मन अन् वाटेल सांगावेसे काही , या इथे या आपण “आयुष्यावर बोलू काही”
राजे तुम्ही एकदा येवून जा.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
राजे तुम्ही एकदा येवून जा.. लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्स दर्शवा
मंगळवार, ३० एप्रिल, २०१३
रविवार, २२ जुलै, २०१२
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा आज वाढदिवस..
भारतासारख्या महाकाय देशात उत्तरेकडून येणार्या हजार वर्षाच्या आक्रमणाला सडेतोड उत्तर देणार्यात छत्रपती शिवाजी महाराज यांचे जे एकमेवाद्वितीय स्थान आहे तेच स्थान गेली पन्नास वर्षे महाराष्ट्रालाशिवगाथा सांगणार्यात शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे आहे. महाराष्ट्राला आज शिवाजी महाराज माहीत आहेत त्यात बाबासाहेब यांचा सिंहाचा वाटा आहे. बाबासाहेब आज नव्वदाव्या वर्षात पदार्पण करत आहेत. गेली साठ वर्षे बाबासाहेबांनी एकच ध्यास सांभाळला आहे तो म्हणजे महाराष्ट्रा तील सामान्य माणसाच्या जीवनात शिवाजी महाराजांचे आदर्श आले पाहिजेत. दहा हजार भाषणे आणि ‘राजा शिवछत्रपती’ या पुस्तकाची काही लाखाच्या अनेक आवृत्या असा पल्ला बाबासाहेबांमी गाठला याच्या मुळाशी शिवचरित्राचा भाव जागा करण्याची अतिशय उत्कट अशी उर्मी हे एकमेव कारण होय. शिवकालाच्या पूर्वी एक हजार वर्षे उत्तरेकडून येणारे आक्रमण थोपविण्याचे प्रयत्न झाले नाहीत असे नाही पण त्यातून यशोगाथा उभ्या राहण्याऐवजी हौतात्म्यगाथाच उभ्या राहिल्या. त्यामुळे शिवचरित्र हा केवळ सनावळ्यांचा इतिहास नसून ती युगायुगातून उभी राहणारी राष्ट्रउभारणीची संहिता आहे. आणि बाबासाहेबांचे वैशिष्ठ्य असे की, १९५०च्या काळात पोटापाण्यासाठी त्या काळी शक्य असणारे भाजी विक्री, पुस्तकविक्री, मास्तरगिरी, भडजीगिरी, प्राध्यापकगिरी हे सारे पर्याय बाजूला ठेवून त्यांनी शिवचरित्र कथन करण्याचे ब्रीद घेतले. त्यातून पोटापुरते मिळवण्याचे ध्येय बाजूला राहो पण त्यातून मिळणारी भाषणमालेची बिदाग्यांची सारी रक्कम शिवसृष्टी उभारणीसाठी राखून ठेवली त्यातून अशा स्वरुपाचे काम करणार्या अनेक संस्था उभ्या राहिल्या आणि आता प्रत्यक्ष शिवसृष्टीही उभी राहात आहे. बाबासाहेबांना जबरदस्त सामर्थ्याची स्मरणशक्ती आणि असामान्य वक्तृत्व यांची देणगी असल्याने संसाराला लागणारा चांगला व्यवसाय करण्यासाठी चांगली प्राप्ती मिळणारे अनेक व्यवसाय उपलब्ध झाले असते पण तो रस्ता सोडून त्यांनी शिवशाहीरीचा बिकट रस्ता स्वीकारला आणि अनेक अग्नीदिव्यातून बाहेरपडून आज प्रचंड मोठे काम केल्याची कृतकृत्यता त्यांच्या जमेच्या खात्यावर आहे.
पु ल देशपांडे यांनी म्हटलय, ‘जगण्यासाठी माणसाला फार महत्वाची गोष्ट मिळावी लागते ती म्हणजे जगण्याचे प्रयोजन. बाबासाहेबांना हे प्रयोजन वयाच्या १६व्या, १७व्या वर्षीच गवसल. ते म्हणजे शिवचरित्र लिहिण्याच. हे प्रयोजन सापडल्यावर पुढील्या बिकट वाटांचे राजरस्ते झाले. एका मास्तरच्या बळवंत नामक मुलाला शिवनेरीच्या शिवरायानं झपाटलं. त्या झपाटलेल्या स्थितीत त्यांचा जीवनप्रवास सुरु आहे व सुरुच राहणार आहे. इतिहासाचा हा मोठा डोळस उपासक आहे. पण त्याच्या भक्तिमार्गावर ज्ञानदीपाचा प्रकाश आहे. निराधार विधाने करायची नाहीत अशी त्यांची प्रतिज्ञा आहे. लिहिताना अखंड सावधपण आहे. अंतःकरणातला कवि मोहोरबंद ¬- गडेदार भाषा लिहितो पण हातातला इतिहासाचा लगाम सुटत नाही. वर्तमानाच्या रिकिबीतून पाय निसटत नाही की नजर डळमळत नाही.हा इतिहासकार भूतकाळाइतकाची वर्तमानाशी जुळलेला आहे.’ पु.ल.देशपांडे यांनी बाबासाहेबांचे जे अचूक शब्दचित्र रंगवलय ते समर्पक आहे.
आज नव्वदाव्या वर्षी बाबांचा उत्साह अक्षरशः तरुणांना लाजवणारा आहे. अजूनही त्यांना तीन हजार पानांचे शिवचरित्र लिहायचे आहे व त्याची तयारी सुरु आहे त्यातूनच अनेक पुस्तके होणार आहेत त्याच प्रमाणे दुसर्या बाजूला शिवसृष्टी उभे करण्याचे काम शेवटच्या टप्प्यात आहे. बरेचसे काम पूर्णही झाले आहे. शिवाय दररज कोठे ना कोठे कोणत्या तरी महत्वाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने शिवचरित्राचे पैलू पुढे येतच असतात. त्यांच्या त्या प्रेरक उत्साहाला विनम्र अभिवादन. बाबासाहेबांनी ही सारी तयारी कशी केली याची ते जेंव्हा मनोरंजन हकिगत सांगतात तेंव्हा आश्चर्य वाटते.साठ वर्षापूवीं सारा विदर्भ बाबासाहेबांनी राजाभाउ देशपांडे यांच्या बरोबर पिजून काढला आहे. अजूनही राजाभाउंची आठवण निघाली की बाबासाहेब अतिशय दुःखी होतात.
बाबासाहेबांचा कुंडलीवर विश्वास आहे की नाही पण कुंडलीत विशोत्तरी महादशा नावाची एक चितनशैली आहे. प्रत्येकाने भक्कमपणे काम करत एकशेवीस वर्षे जगावे अशी अपेक्षा त्यात व्यक्त झालेली असते. शिवचरित्राच्या प्रत्यक्ष उभारणीसाठी बाबासाहेबांना एक विशोत्तरी मिळावी ही सर्व गृह आणि तारे यांच्या चरणी प्रार्थना....

गुरुवार, ७ जून, २०१२
ईतिहासाचा राजा.. फक्त छत्रपति माझा..
ईतिहासाचा राजा..
फक्त छत्रपति माझा..
आम्हाला फक्त तुझ्या
जयजयकाराची भुक..
फितुराना घेतल डोक्यावर हिच
मराठ्यांची मोठी चुक..
राजकीय सोंग सारी कोण कोणाला
मानतो..
ते
शिवाजी महाराज कि
म्हणतात आम्ही फक्त
जय
म्हणतो..
विचार करा मराठ्यानो हे
उष्ट्या पात्रवळ्यावरचे उष्टे
द्रोण..
कळत नाहीकारे रक्ताची नाती
अन
फितुर कोण..
आरे
आठवा त्या शंभुला ज्यान औरंग्या
जरजर केला..
तोच
छत्रपति शंभु ज्यांचा यांच्याच
बापजाद्यानी घात केला..
म्हणुन जिंकता नाही आले
या दुनियेला..
अजुनही वेळ गेली नाही..
वाघांची संख्या कमी झाली नाही..
आज जे दिसतय ते मराठ्यांच्या
बरबादिचे दृष्य आहे..
सुधरुन घ्या तुमच्या हातात
उद्याच्या मराठ्यांचे
भविष्य आहे..
जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे......!!
बुधवार, १६ मे, २०१२
राजे तुम्ही एकदा येवून जा..
राजे तुम्ही एकदा येवून जा
विसरलाय स्वाभिमान प्रत्येक मराठा
विसरलाय स्वताचीच अस्मिता
त्याच्या डोळ्यात थोड अंजन घालून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
तलवारीसुधा झाल्यात गवताची पाती
विसरलोय आम्ही आपापसातील नाती
विस्कटलेली घरटी एकत्र करून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
गडकिल्ले झालेत पर्यटन स्थळे
राजकीय नेत्यांची विश्रांती स्थळे
याच गडकोटाना हक्काची गडवाट देवून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
चुरगालीयेत पाने इतिहासाची
राजे तुमच्या प्रत्येक पराक्रमाची
इतिहासाच्या पुस्तकाला व्यवस्तीत कव्हर घालून जा
राजे तुम्ही एकदा येवून जा
उशिरा का होईना
एकदा तरी येवून जा
नाहीच जमलं राजे तुम्हाला यायला तर
या सह्याद्रीला पुन्हा एकदा छावा देवून जा.

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)