मराठी माणूस म्हणजे... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
मराठी माणूस म्हणजे... लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, १४ जून, २०१२

आचार्य अत्रेंचा आज स्मृतिदिन...



आचार्य अत्रेंचा एक किस्सा

एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.


एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्‍यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”


बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”


“व्हय तर!”


“किती कोंबड्या आहेत?”


“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”


“आणि कोंबडे किती?”


“कोंबडा फक्त एकच हाये.”


”एकटा पुरतो ना?”


उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.


आज त्यांचा स्मृतिदिन...

शनिवार, २ जून, २०१२

आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!!


शुक्रवारी सुहास खामकर ने "भारत श्री" किताब पटकावला पण नेहमी प्रमाणे इतर खेळाची दाखल न घेणाऱ्या मिडीयाने ... 

ह्या कडेही काना डोळा केला..... किमान मराठी मिडीयाने तरी ह्याची दखल घ्यायला हवी होती..... 

आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!! 

बुधवार, ९ नोव्हेंबर, २०११

मराठी माणूस म्हणजे...

मराठी aslycha अभिमान balga अन sagalikade sher kara..

मराठी माणूस म्हणजे कर्तुत्व ,शौर्य याचे उदाहरण उत्तम ...
मराठी माणूस म्हणजे कौशल्य अन अफाट बुद्धिमत्ता प्रथम ....
मराठी माणूस म्हणजे प्रतेकाच्या शरीरात सल्साल्णारे रक्त ...
... मराठी माणूस म्हणजे प्रतेक संकटाला हसत सामोरे जाने फक्त ...
मराठी माणूस म्हणजे मी आम्ही तुम्ही कधी न झुकणार ,कधी न वाकणार ..
मराठी माणूस म्हणजे मी आम्ही तुम्ही कधी न थकणार ,कधी न हरणार ..
मराठी माणूस म्हणजे प्रेम आपुलकी दया मदत कोणत्याही क्षणी ...
मराठी माणूस म्हणजे धोका फसवणूक इर्षा कदीच न कोनाच्य्ही मनी ....
मराठी माणूस म्हणजे धडाडी ,पराक्रम ,निश्चय .......
मराठी माणूस म्हणजे अभिमान ,स्वाभिमान ,एकच आशय .,
मराठी माणूस म्हणजे
म म्हणजे महान
रा म्हणजे राकट
ठी म्हणजे ठिकाणावर असलेला ..
मराठी माणूस म्हणजे कधी न बाटलेला ..
मराठी माणूस म्हणजे वीरांचा इतिहास
मराठी माणूस म्हणजे एकतेचा एकच ध्यास ..
मराठी माणूस म्हणजे उज्वल भविष्य ..
मराठी माणूस म्हणजे मराठी बाणा हे एकच लक्ष ...
मराठी माणूस म्हणजे भारताची शान ,पर्म्पेरेचा मान..
मराठी माणूस म्हणजे मानवता जपणारा एकच MAN.
जय महाराष्ट्र !!!...