सुख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
सुख लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शनिवार, ७ जुलै, २०१२

लेहेरोनसे से डर कर नौका पार नाही होती , हिम्मत करणे वालोंकी हार नाही होती ,

ऑस्कार पिस्तोरीओउस (Oscar Pistorius ) ... ह्या दोन्ही पायाने अपंग असलेल्या साउथ आफ्रिकन धावपटूला लंडन olympics ४०० मीटर्स व ४०० x ४ मीटर्स ह्या स्पर्धेत भाग घेण्याची सुवर्णसंधी प्राप्त झाली आहे...वयाच्या पहिल्याच वर्षी जर्जर आजाराने दोन्ही पाय गमवून बसलेल्या ऑस्कार ने हिम्मत न हरता आपली वाटचाल कृत्रिम पायाच्या सहायाने अत्यंत धैर्याने व कणखरपणे सहनशीलतेने पार केली.. दुर्दम्य इच्छाशक्ती व प्रचंड आत्मविश्वासाच्या बळावर त्याने अनेक स्पर्धात धडधाकट प्रतीस्पर्द्याना धूळ चारत चार सुवर्ण पदके व एक जागतिक विक्रम आपल्या नावावर करत एक नवा अध्याय लिहिला ..
आता हा जिगरबाज धावपटू आता लंडन ओल्य्म्पिच्स मध्ये धावणार आहे..त्यासाठी त्याला सुभेच्या व त्याच्या या जिगरबाज वृतीला सलाम...सलाम ऑस्कार पिस्तोरीओउस

बुधवार, ६ जून, २०१२

सुख म्हणे शोधायच नसत ते आपोआपच मिळत खरच अस असत का?



सुख म्हणे शोधायच नसत ते आपोआपच मिळत
खरच अस असत का?
मग ह्या जगात कुणीच दुक्खी नसत नाही का?
सुख हे मानन्यावर असत अस मला वाटत

कुणाला पावसात अखंड भिजुन सुख मिळत
तर कुणाला नुसताच पाउस बघून सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला प्राजक्ताच्या सुवासात सुख मिळत
तर कुणाला तीच फूल तोडून सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला मित्रांमध्ये रमण्यात सुख मिळत
तर कुणाला एकटाच रहाण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला प्रियकराची वाट बघण्यात सुख मिळत
तर कुणाला प्रियकराला वाट बघायला लावण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला प्रेम देण्यात सुख मिळत
तर कुणाला प्रेम घेण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला ही कविता लिहिण्यात सुख मिळत
तर कुणाला ही कविता वाचण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला देव देव करण्यात सुख मिळत
तर कुणाला फक्त मनापासून नमस्कार करण्यात सुख मिळत
सुख हे मानन्यावर असत......

कुणाला हसता हसता आयुष्याशी दोन हात करण्यात सुख मिळत
तर कुणाला रोज़ रोज़ रडून रडून जगण्यात सुख मिळत .