श्रद्धांजली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
श्रद्धांजली लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

माझ्या पुरोगामी महाराष्ट्रा.... आता अघोरी पूजेचे सत्र सुरु झालेय...!


अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेवून
महाराष्ट्राच्या
संतांचा वारसा पुढे घेवून जात
असलेल्या नरेंद्र दाभोळकर
यांच्या गोळी झाडून करण्यात
आलेल्या हत्येने आज
पुरोगामी महाराष्ट्राचा खून झाला. संत
तुकाराम महाराज
ज्या त्यांच्या गाथेतील अभंगात म्हणतात,
‘तीर्थी दगड धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनी...!!’
आणि ...
‘नवशे कन्या पुत्र होती
तर का करावा लागे पती....!!’
त्याच गाथेचा आज दुसऱ्या मंबाजीकडून खून
झाला....
माझ्या पुरोगामी महाराष्ट्रा....
आता अघोरी पूजेचे सत्र सुरु
झालेय...!

शनिवार, २९ डिसेंबर, २०१२

जमल्यास क्षमा कर....



जमल्यास क्षमा कर...... 
षंढ लोकांनी घेतलेला एक बळी..अनेक यातनांमधून तिची सुटका झाली. अस म्हणतात ह्या देशात जन्माला येण्यासाठी खूप पुण्य असाव लागत पण आता अस वाटत की स्त्री म्हणून ह्या देशात जन्माला येण्यासाठी नक्कीच काहीतरी भयंकर पाप केलेलं असणार..हे कसले रक्षक हे तर भक्षकच...त्या मुलीच्या अनंत यातना पाहताना त्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल ? इतक्या प्रेमाने कोड कौतुकाने आपल्या मुलीला मोठ करताना त्यांना हि कल्पनाही नसेल कि पोटाच्या गोळ्याची हि अशी अवस्था पहावी लागेल. हे दुखः फक्त त्यांचच नाही तर अनेक आईवडीलांच आहे ज्यांच्या निरागस निरपराध मुली ह्या असल्या वासनांध लोकांच्या अमानवीय भुकेला बळी पडतात. समाज म्हणून आता तरी जागे व्हा ...फक्त श्रद्धांजली नाही तर अशा सरकार आणि लोकांविरोधात उभे राहा आणि एक सक्षम कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडा नाहीतर हि घटनाही विसरून जाल ....हीच त्या मुलीला खरी श्रद्धांजली असेल कि पुन्हा अस कुठल्याही मुलीच्या बाबतीत कधीही घडू नये..