शाळेतले दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
शाळेतले दिवस लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

रविवार, १५ जुलै, २०१२

♥♥♥आता फक्त तूच आहेस या वेड्या मनात..♥♥♥


अशीच एक मुलगी... साधारण शी सजणारी..
आणि हळुवार लाजणारी..
गोजिरी दिसणारी..
आणि खूप गोड हसणारी... अशीच एक
मुलगी..
काल स्वप्ना मधी दिसली..
आणि मला बघून हसली..
कोण जाने कशी माझ्या स्वप्नात घुसली..
आणि माझ्या हृदयात घर करून बसली..
गुलाब सारखे लाल ओठ.. सागरा सारखे डोळे..
... तिचे केस..वेली सारखे लांब
आणि नभा सारखे काळे तिला मी ब...
घितलं श्वेत फुलांच्या वनात.. अन पूर्ण
साठवल माझ्या मनात..
तिच्या पैन्जानीचा आवाज आणखी पण
तसाच कानात गुंजतो..
आणि सांगतो.आहे .मी तुझीच आहे.!!
मी तुझीच आहे..
पण कुणीतरी माझी चादर ओढली..
आणि माझी साखर झोप मोडली..
परत कधी येशील ग प्रिये.स्वप्नात ..
♥♥♥आता फक्त तूच आहेस
या वेड्या मनात..♥♥♥
♥♥♥आता फक्त तूच आहेस
या वेड्या मनात..♥♥

रविवार, १ जुलै, २०१२

रावणाला कोणी मारला ?

एक शिक्षण अधिकारी
एकदा एका शाळेत गेला
सहजच एका वर्गात शिरला,
एक साथ नमस्ते - सारा वर्ग बोलला.
बसा, मुलांनो बसा - अधिकारी म्हणाला.

"
रावणाला कोणी मारला ?" - ऐसा प्रश्न् विचारला
सारा वर्ग शांत शांत जाहला

प्रश्न् पुन्हा एकदा विचारला
"मी नाही मारला, मी नाही मारला - प्रत्येकजण बोलला

अधिकारी खूप वैतागला, मास्तरांना म्हणाला -

"रावणाला कोणी मारला, का येत नाही मुलांना ?"
मास्तरांनी खुलासा केला -

आमचा विद्यार्थी साधा भोळा
गांधी अहिंसा ठाऊक त्याला
कशाला कोण मारेल रावणाला ?
अधिकारी आणखी वैतागला,

मुख्याध्यापकांकडे गेला,
झाला प्रकार सांगितला,
"रावणाला कोणी मारला ?
विद्यार्थी सांगत नाहीत" - म्हणाला


मुख्याध्यापक म्हणाले -
"शाळेच्या आवारात मारला, की शाळेच्या बाहेर मारला ?";
"जर शाळेच्या आवारात 
मारला तर बघतो एकेकाला
जर शाळेच्या बाहेर मारला तर आमचा संबंध कसला ?

सोमवार, ११ जून, २०१२

शाळा सुटली...



संदूप झाला,शाळा सुटली
टचकण डोळे भरुनी आले……..
शाळा सुटली, दफ्तर गेले
Collegla one side bag झाले……….
शाळा सुटली, गुरुजी-बाई गेले,
मिस सर नावाचे लक्ष न देणारे शिक्षक
आले…….
शाळा सुटली, परीक्षा संपली,
सेमीस्टर म्हणुनी परत आली…….
शाळा सुटली, वर्ग गेले
आता वर्ग college कट्ट्यावरभरु
लागले………
शाळा सुटली , अचानक
मिळणारी सुट्टीची मजा गेली
बंकीक मुळे
त्याची मजा नाही राहीली………………
शाळा सुटली ,
तो डब्बा आणि त्यातली maggy गेली
आता डब्बा आणयला आणि maggy
खायायला लाज वाटु लागली
शाळा सुटली , तो पीटी चा तास गेला,
Sports मध्ये आम्हाला अडकवुण ठेवला……
शाळा सुटली , खुप सा-
या पुस्तकांचा ओझा गेला,
आणि वर्ष भरात एक वही असा सुत्र बनुन
गेला……
शाळा सुटली, एक नंबर
काढण्याची स्पर्धा गेली,
आता तर पासींग
ची मारामारीझाली…………
शाळा सुटली,
च्याइला माइलाशिव्या गेल्या,
आता तोंडाला वाईट सवय,
विदेशी शिव्या आल्या ……..
शाळा सुटली, ती आपपसातील मस्ती भांडण
संपली,
मस्तीची आता matters झाली,………
शाळा सुटली , मैत्रीण पण गेली,
Girlfriend बनुनी परत आली………
शाळा सुटली ,आमच्या मित्रांची मैत्री मात्र
तशीचं राहीली,
गेले ते दिवस, मात्र त्यांची आठवण
बनुनी राहीली…….
पण………. शाळा सुटली……

सोमवार, ४ जून, २०१२

सुट्टी

सुट्टी
सुट्टी...सगळ्यांच्याच जिव्हाळ्याचा विषय. आणि आजकाल काहींच्या हेव्याचा पण... ;-) 
तर...सुट्टीत एक सर्व साधारण प्रश्न सतत येऊन कानाला बोचत असतो. मग आत्ता काय करणार सुट्टीत? अर्रे... वर्षभर इतके डोकी फोडत असतो...तर सुट्टीत हि काहीतरी करायलाच हवे का? शांत निवांत बसूच नये कि काय माणसाने?
( अर्थात हे माझ्या सारख्या महा आळशी लोकांचे मनोगत आहे तेव्हा समजून घ्या...) पण एकूणच मुलांनी सतत गुंतून पडावे
असे का वाटते राव सगळ्यांना?
हे शिबीर ते courses...एक न हजार गोष्टी. सुट्टीत मज्जा करण्याची concept नाहीच उरलीये बहुदा आत्ता.
( बहुतेकदा मुलांचा हट्ट असतो वैगरे सगळे ठीके...मी पण केलीयेत बर्रीच नाटके सुट्टीत.) पण Forcefully, केवळ मुले अडकून रहावीत ह्या उद्देशाने आई बाबा इकडे तिकडे नवे नोंदवतात ना मुलांची ते नाही आवडत मला...
कधी कधी तर ह्याचा मुलगा हे करतोय आणि त्याची मुलगी ते करतेय म्हणून आई बाबा मुलांना पिटाळतात सगळीकडे ते तर भार्रीच
irritating असते.
आजू बाजूची लहान मुले खरेतर इतर वेळी जास्त मजा करत असतात, असे general observation आहे माझे.
सुट्टी आई बाबांच्या म्हणण्या प्रमाणे च घालवली जाते शक्यतो...
माझ्या मते...सुट्टी झोपायला, खेळायला, काही न करता आळशी पणे बसून राहायला, TV वर उग्गाच काहीही nonsense बघायला, तासान तास फोन वर बोलायला आणि आई बाबांना न आवडणार्या अनेक गोष्टी करून वर "...मग सुट्टी सुरु आहे न माझी" असे ऐकवायला असते.
त्यामुळे मी तरी "काहीही" न करता छान हात पाय पसरून आराम करतेय सुट्टीत...उन्हाळ्याची सुट्टी ह्या साठीच तर असते न..

रविवार, २७ मे, २०१२

आपल्या लाइन कडे बघणं सुध्धा एक कला ए.




आपल्या लाइन कडे बघणं सुध्धा एक कला ए..
लाइनला पण नाही कळलं पाहिजे कि आपण तिच्याकडे बघतोय..
समोर Madam किंवा Sir आले ना तरी पण आपल्याला आपल्या लाइनकडे बघता आलं पाहिजे..
एकदम सुमडीत... 

शनिवार, २६ मे, २०१२

शाळेतील ते दिवस..,

गेले ते दिवस आणि राहल्या त्या आठवणी ...........

किती लोकाना आठवतात शाळेतील ते दिवस आणि मधल्या सुटीत जाऊन थंड गोळा वाल्या काकाकडून विकत घेऊन ह्या गोळ्याचा आस्वाद घेतलेला. .........

आज पण जेव्हा मी कोणत्या शाळेपासून जातो आणि गोळे वाले काका जेव्हा आपल्या थंड गोळ्याचा ठेला घेऊन गोळा विकत असतो तेव्हा शाळेतल्या ते दिवस माझ्या स्मुर्ती पटलावर अवतरतात.