“आई मागितली असती..” लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
“आई मागितली असती..” लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

शुक्रवार, २ ऑगस्ट, २०१३

आई


एक ७ वर्षाच्या मुलाची आई वारते ते..!

वडील दूसर लग्न करतात...

एक दिवस वडिल

आपल्या मुलाला विचारतात कि बेटा,

तुला तुझ्या जुन्या आईत आणि नविन आईत

काय फरक जाणवला..?

मुलगा बोलला : माझी नवी आई खरी आहे

आणि जुनी आई खोटी होती..!!

हे ऐकुन वडिलांना आश्चर्य वाटलं,

त्यांनी परत विचारलं : का तुला असं

का वाटलं बेटा..?

जिने तुला जन्म दिला ती खोटी आणि काल

परवा आलेली नवी आई खरी कशी..?

मुलगा बोलला :

जेव्हा मी मस्ती करायचो तेव्हा

माझी जुनी आई बोलायची कि"जर तु

अशीच मस्ती करत राहिलास तर

तुला जेवण मिळणार नाही"

तरी मी

खुप मस्ती करत रहायचो

आणि ती मला पुर्ण गावातुन शोधुन

घरी आणायची आणि

अपल्या जवळ बसवुन जेऊ घालायची..!!

आणि ही नवी आई बोलते कि"जर तु

मस्ती करत राहिलास तर तुला जेवण

नाही देणार.... आणि खरच

तिने मला आज तीन दिवस झाले जेवण

नाही दिले...

शनिवार, ६ ऑक्टोबर, २०१२

कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते

कदर करा त्या आईची जी तुमच्यासाठी जीवाचं रान करते
प्रेम करा त्या आईवर जी तुमच्या भल्यासाठी स्वतःचा विचार करत नाही
सेवा करा त्या आईची जिने नऊ महिने तुमच्या लाथा सोसल्या पण कधी तुमच्यावर रागावली नाही
थोडा विचार करा त्या आईचा जी स्वतः उपाशी राहते पण तुम्हाला कधी ऊपाशी ठेवलं नाही
 

रविवार, ८ जुलै, २०१२

माझी आई जगातील सर्वात सुंदर आई

दुखी आई तिच्या मुलाजवळ
बसली होती .......
मुलगा : माझ्या आजवरच्या पाहण्यात तू
दुसरी सुंदर आई आहेस...
आई : पहिली कोण ?
.
..मुलगा : तूच.... पण जेव्हा तू हसतेस..


शनिवार, १२ मे, २०१२

“आई मागितली असती..”

दु:खाच्या डोंगराखाली
दबलेल ते बालपण
रोजचं होता वैशाख
कधी दिसलाचं नाही श्रावण
नव्हता आपल्यांचा आपलेपणा
नव्हती भाग्याची साथ
लेकराच्या डोक्यावर ठेवायला
नव्हता मायेचा तो हात

कधी नाही पाहीली बासुंदी
कधी पाहिला नाही मुरंबा..
बहीण बापुडी काय करणार
नव्हता बापाचाही खांदा.

जेव्हा मला माय
सोडुन निघुन गेली
डोळ्यातली ओली
आसवं सुकुन गेली.

कधी कधी ते एकटेपणाचं सावटं
मनात काहुर माजवायचं
माय परत येईल
भोळ मन स्वप्न सजवायचं

बालपण सारं गेलं
वेदनांच्या सागरात बुडुन
मग संस्कारांचा
मऊपणा येणार तरी कुठुन

नव्हती मायेची सावली
नव्हता प्रेमाचा गारवा
सुकून गेलं रोपट
पण मिळला नाही ओलावा

आज ही दुःखाची सावट
तशीचं राहीली
कधी मायेचा उबारा
कधी माया नाही पाहीली

नको धनदौलत नको संपत्ती
कशावरचं आशा ठेवली नसती
देवाने काही मागायला सांगितलं असतं
तर मी “आई मागितली असती..”