जय महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
जय महाराष्ट्र लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

गुरुवार, २२ ऑगस्ट, २०१३

महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सलाम..!!



घरापासून दूर आभाळच पांघरून करून घेतलेली 'क्षणभर
विश्रांती '
माणसेच आहेत ती १८ -१८ तास डूटी करून
दमतात बिच्चारी ....
साहेबांची ओर्डेर ,नेत्यांचा बंदोबस्त ,दहशतवादाश
डूटी, कर्फ्यू या सगळ्या गदारोळात
त्यांना विचारून पहा,
"काका तुम्ही घराचा गणपती कधी बसवता ?...,
काका तुम्ही कधी तुमच्या छकुलीच्या ग्यादरिंगल
गेले
होता का ?त्यांच्याकडे या प्रश्नांची उत्तरे
नसतात...
आपण नेहमी पोलिसांना शिव्या घालत
असतो पण
या गोष्टींचा कधी विचार केला आहे का..?
महाराष्ट्र पोलिसांना मनापासून सलाम..!!

शुक्रवार, २१ जून, २०१३

जगण्यासाठी फक्त कोकण हवा कोकण हवा......


जगण्यासाठी फक्त कोकण हवा ...
नको तो AC नको तो Fan
मला वाडीतला गारवा हवा
नको तो shower नको तो बाथ टब
मोरीतल्या पाण्याचा थंडावा हवा
नको तो बेड नको तो फोम
खाटेवरचा मऊपणा हवा
नको तो burger नको ते snacks
प्यायला सोल-कढी खायला मोदकच हवा
नको ती bislari नको ते mineral water
खारट का असेना, पाण्याला चवदारपणा हवा
नको त्या Tiles नको ते रेड कार्पेट
घरात गालीचा सुद्धा लाल मातीचाच हवा
नको ते Apple नको ते Orange
काटेरी असला तरी फलाहाराला फणसच हवा
नको त्या Timelines नको त्या Deadlines
वेळ सुद्धा समुद्रासारखा अमर्याद हवा
नको ती गर्दी नको ते प्रदूषण
नको ते मुखवटे नको तो भपकेपणा
लाटांप्रमाणे एकामागे एक संकटे झेलणारा,
दिवस रात्र दारिद्र्याशी लढणारा,
Mall, Multiplex, MNC चे तोंड देखील न पाहिलेला,
रेतीला चटई आणि आभाळाला पांघरूण मानणारा,
भरती ओहोटी च्या काट्यांवर चालणारा,
समुद्याच्या लाटांच्या आवजालाच Music मानणारा,
‘अतिथी देवो भव:’ तत्व जगणारा,
नैसर्गिक खजिन्याने खिसा भरणारा,
आणि सर्वात महत्वाचे म्हणजे , माणसातली माणुसकी जपणारा
जगण्यासाठी फक्त कोकण हवा
कोकण हवा............ !!!!!

मंगळवार, ३० एप्रिल, २०१३

महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



माझ्या तमाम मराठी बंधू आणि भगिनींना महाराष्ट्र दिनाच्या भगव्या शुभेच्छा … संयुक्त महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!



सोमवार, १४ जानेवारी, २०१३

मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा !!



घ्या भरारी पतंगासम.. बहरु द्या तुमचे मन.. विसरा दुःख तुम्ही सारं.. फुलावा तुमचा प्रत्येक क्षण..!! ह्याच माझ्या संक्रांतीच्या तुम्हाला शुभेच्छा...!!! आपले नातेसंबंध असावेत तर फुलांसारखे.. तीळ आणि गुळासारखे.. तितकेच आनंददायी.. तितकेच घट्ट आणि तितकेच मधुर...!! स्नेह आहेच.. वृद्धिंगत व्हावा हिच अपेक्षा....!!!! 

 








बुधवार, २५ जुलै, २०१२

असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..

असे कुनापुढे झुकनारी हि मान नाही..
मि राजा आहे रयतेचा शैतान नाही..
आभिमान आम्हाला आमच्या मातिचा..
माज आहेच मराठ्याच्या ज्यातिचा..
या छातित धमक आहे स्वराज्य उभे करण्याची..
औरंग्या तुझी औकात नाही मराठ्यांना पराभुत करण्याची..
तुला माज असेल रे या तख्ताचा..
तौबा करशील तु तडाखा पाहुन भगव्या रक्ताचा..
तु काय आम्हाला धाक दाखवीतो..
जो सर्वांचा काळ आहे तोच आम्हाला भितो..
राख होते शत्रुंची अशी डोळ्यात आमच्या आग आहे..
लांडग्याची जात तुझी
मि सह्यांद्रिचा वाघ आहे.

जय जिजाऊ....!!
जय शिवराय....!!
जय शंभु राजे....!!

रविवार, २२ जुलै, २०१२

पीठ भाकरीचं एका

पीठ भाकरीचं एका

पीठ भाकरीचं एका
एक भाकर थापली
चुलीत मारुन फुका
भाकर तव्यावर टाकली

पोर रडलं झोळीत
माय लगेच धावली
त्यास झोळीतुन काढत
मांडीवर पाजु लागली

गोवरी शेवटची होती
खुप दमानं पेटली
ज्वाला धगधगली होती
तिनं भाकर जाळली

अंगणी खेळुन आलं
दमुन भागुन घरात
पोर दुसरं भुकेलेलं
भुक मावेना पोटात

मागु लागलं भाकरी
पिळलेले हात पाय
माय कावरी बावरी
समजेना करावे काय


शनिवार, ७ जुलै, २०१२

भगवा

शब्द भगवा...
अर्थ भगवा....
माज भगवा...
नाद भगवा...
वीरांचीहि जात भगवा
गान भगवा मान भगवा हिंदूचा अभिमान भगवा
शेत्र भगवा गोत्र भगवा मंदिराचे तीर्थ भगवा
ह्या भगव्याच्या प्रतीश्तेसाठी रक्त अमुचे पडू दे..
ज्या दिवशी भगव्याच अम्च्यामानातून काढू
हे भवानी माते आम्हा मृत्यू दे...
जय भवानी...
जय शिवराय...

राज ठाकरे - बाबासाहेब पुरंदरे यांचे दुर्मिळ छायाचित्र..


जय शिवराय


आम्ही एकदाचबोलतो,


नाहीऐकल तरजित्तच फाडतो.


आम्हीकधी घाबरत नाही.


पाचपाऊल मागे सरकुनकापल्याशिवाय राहतनाही.
जय भवानी
जय जिजाऊ
जय शिवराय
 

रविवार, १७ जून, २०१२

राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ पुण्यतिथी [१२ जानेवारी १५९८- १७ जून १६७४] विनम्र आभिवादन.



स्वराज्य स्थापन झाले. रायगडावर महराजांचा भव्य दिव्य असा राज्याभिषेक झाला. आऊ जिजाऊ च्या डोळ्यांसमोर शिवराय 'छत्रपती' झाले. जिजाऊ साहेबांच्या डोळ्यांचे पारणे फिटले. ज्या स्वराज्यासाठी अवघं आयुष्य या आईने वेचले, ते स्वराज्य शिवबाच्या छत्रपती होण्याने भक्कम झाले होते. विश्वाचे डोळे दिपले होते तो समारोह आणि राजेपण पाहून आणि या आईच्या डोळ्यात साठले होते आनंदाचे अश्रू. स्वराज्यासाठीचा संघर्ष आणि त्यातील जय आणि पराजय सारं काही पाहिलं, अनुभवलं आणि मार्गदर्शील होत आऊ साहेबांनी. ह्या सगळ्या आठवणी डोळ्यात साठवून जिजाऊ साहेबांनी १७ जून १६७४ रोजी रायगडाच्या पायथ्याशी पाचाड येथे या जगाचा निरोप घेतला. स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाची एक मशाल तो विचार प्रत्येक मावळ्यात आणि शिवबात तेवत ठेवून शांत झाली. मशाल शांत तेंव्हाच झाली जेव्हा गुलामगिरीचे जंगल जवळपास नष्ट झाले होते. राज्याभिषेकाच्या निमित्याने त्या गुलामगीरीने आच्छादलेल्या मातीत स्वराज्याची फुलबाग रुपाला आली होती. एका धगधगत्या मशालीला आपल्या ठिणग्यांचा वनवा करावा लागला होता आणि तेंव्हा कुठे ही फुलबाग. 

त्याच फुलबागेतली फुलं, त्याच मावळ मातीतली फुलं, तोच प्रामाणिक स्वातंत्र्य आणि स्वाभिमानाचा विचार देठ असणारी फुलं आणि महाराष्ट्रातील असंख्य मराठी माणसांच्या हातातून आलेली फुलं राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेब यांच्या चरणी अर्पण करून जिजाऊ.कॉम आज पुण्यतिथी दिनी स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या या भवानीला कोटी कोटी अभिवादन करते.
आज जिजाऊ साहेबांना जाऊन ३०० पेक्षा ही अधीक वर्षे झाली, पण विचारांनी जिजाऊ साहेब आपल्यातच आहेत. त्यांच्याच स्वाभिमान आणि स्वातंत्र्याच्या विचारांनी बळ दिले आणि जिजाऊ.कॉम हा संकल्प मे २००९ मध्ये साक्षात आला. अगदी प्रकल्प वेब वर जाताच लोकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळाला आणि हात घेतलेले कार्य फक्त दोघांना पेलवणारे नाही हे जाणवले. मदतीसाठी हाक दिली आणि बघता बघता महाराष्ट्रभरातून अनेक जणांचे हात मदतीसाठी धावून आले. माहितीची भर पडली आणि पुन्हा माहितीची अपेक्षा ही वाढली. महाराष्ट्राच्या काना कोपऱ्यातून खेड्या-पाड्यातून फोन येऊ लागले. माहिती साठी आसुसलेला आणि माहिती नसल्यामुळे काही अंशी मागे पडलेला महाराष्ट्र कानाने ऐकला आणि डोळ्यांनी वाचला. म्हणूनच पुन्हा नवीन स्वरुपात जिजाऊ.कॉम आणण्याचा विचार झाला. आणि आज, त्या नवीन स्वरुपासाहित, जिजाऊ.कॉम आऊसाहेबां चरणी अर्पण करत आहोत.
राष्ट्राच्या काना कोपऱ्यात, खेड्यात, शहरात अनेकजण या ना त्या प्रकारे राष्ट्रनिर्माणासाठी काही ना काही करत आहेत. काही लोक संघटीत होऊन झुंज देत आहेत तर काही लोक एकटेच. त्या प्रत्येक कार्यकर्त्याला (कृपया कार्यकर्ता म्हणजे कार्यकर्ती ही वाचा) जिजाऊ.कॉम हे एक हक्काचे व्यासपीठ आहे. धर्म, जात, पक्ष आणि वर्ग विरहित चळवळीचे एक माहेरघर आहे. अनेक प्रश्नांनी लादलेली आपली डोकी कुठे तरी रिकामी करायची असतील, जाचक व्यवस्थेबद्दल आवाज उठवायचा असेल किंवा मग एखादया विषयावर मार्गदर्शन हवे असेल तर जिजाऊ.कॉम हे प्रत्येक कार्यकर्त्याचे हक्काचे ठिकाण व्हावे हे आम्हा सर्व कार्यकर्त्यांचे स्वप्न.
आऊ जिजाऊ च्या नावे चालणारी ही चळवळ आपल्या सगळ्यांना राष्ट्रानिर्मानात मार्गदर्शन करत राहो हीच आऊसाहेबां चरणी प्रार्थना. पुन्हा एकदा त्या माउलीला, आऊ जिजाऊला, राष्ट्रमातेला कोटी कोटी अभिवादन.
जय जिजाऊ. 

गुरुवार, ७ जून, २०१२

ईतिहासाचा राजा.. फक्त छत्रपति माझा..



ईतिहासाचा राजा..
फक्त छत्रपति माझा..
आम्हाला फक्त तुझ्या
जयजयकाराची भुक..
फितुराना घेतल डोक्यावर हिच
मराठ्यांची मोठी चुक..
राजकीय सोंग सारी कोण कोणाला
मानतो..
ते
शिवाजी महाराज कि
म्हणतात आम्ही फक्त
जय
म्हणतो..
विचार करा मराठ्यानो हे
उष्ट्या पात्रवळ्यावरचे उष्टे
द्रोण..
कळत नाहीकारे रक्ताची नाती
अन
फितुर कोण..
आरे
आठवा त्या शंभुला ज्यान औरंग्या
जरजर केला..
तोच
छत्रपति शंभु ज्यांचा यांच्याच
बापजाद्यानी घात केला..
म्हणुन जिंकता नाही आले
या दुनियेला..
अजुनही वेळ गेली नाही..
वाघांची संख्या कमी झाली नाही..
आज जे दिसतय ते मराठ्यांच्या
बरबादिचे दृष्य आहे..
सुधरुन घ्या तुमच्या हातात
उद्याच्या मराठ्यांचे
भविष्य आहे..

जय जिजाउ....!!
जय शिवराय....!!
जय शभुंराजे......!!

उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय ..



उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय ..

उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय ..
उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय
कधी तुमच्या शब्दासाठी जीव देणारा
आज आपल्याच धर्मविरोधा त उठलाय राजे ..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

कट्टर मराठा म्हणता म्हणता
यानी धर्मावरच घाव घातलाय..
चार मतांसाठी तुमचा निश्चयच गाडलाय राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

जाती-पती मोडून राजे धर्म तुम्ही सावरला
हिंदुत्वाची लाट पाहुनी औरंग सुद्धा बावरला
तोच हिंदू सध्या धर्मावरती उठलाय राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

एक नाही कळत राजे हा मराठा का हे विसरलाय
शिवा- न्हावीच काय तर बाजी-तानजीसुद्धा
इथे फक्त मराठा म्हणूनच लढलाय , राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

बाजीराव सुद्धा राजे मराठा म्हणून लढला
घेऊनी वीर मराठे तो थेट दिल्लीला भिडला
तोच बाजीराव आता फक्त एक ब्राम्हण राहिलाय, राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

राजे एवढाच पुरे नव्हतं की काय म्हणून
आज तुमचा इतिहासच यांनी खोटा ठरवलाय
तुमच्या नावाने यांनी आपलाच इतिहास लिहिलाय राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

ब्राम्हण-महार-रामोशी सुद्धा इथे मराठा म्हणून लढले
मुरारबाजी सुद्धा राजे मराठा म्हणूनच पडले
रामोश्यानी गड मराठा म्हणूनच राखलाय, राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय

काही राजकारन्यांनी हा मतांसाठी डाव आखलाय
तुमच्या नावाखाली राजे लोकशाहीचा बाजार मांडलाय
आणि यांच्या राजकारणाला भोळा मराठा बळी पडलाय, राजे..
आज तुमचा मराठा खरच खूप भरकटालाय

तुम्हीच शिकावा राजे का मराठा कसा घडला
जातीपाती गाडून तो धर्मवेडा कसा ठरला,
इथे कसा तो या माणसासाठी नडला
इथे कसा तो या धर्मासाठी लढला
इथे कसा तो त्या शत्रूला भिडला
इथे कसा तो या मातीसाठी पडला आणि..
इथे कसा तो या स्वातंत्र् यासाठीउडाला राजे..
आज तुमचा मराठा बघा खूप भरकटालाय, राजे..
आज तुमचा मराठा बघा खूप भरकटलाय

शनिवार, २ जून, २०१२

आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!!


शुक्रवारी सुहास खामकर ने "भारत श्री" किताब पटकावला पण नेहमी प्रमाणे इतर खेळाची दाखल न घेणाऱ्या मिडीयाने ... 

ह्या कडेही काना डोळा केला..... किमान मराठी मिडीयाने तरी ह्याची दखल घ्यायला हवी होती..... 

आयुष्यावर बोलू काही.. BLOG तर्फे सुहासच अभिनंदन!! 

रविवार, २० नोव्हेंबर, २०११

जय महाराष्ट्र

जेव्हा सिंह उभा राहतो तेव्हा भटकती कुत्री घाबरून एकत्र जमतात!!!!!!!!!!!!!!!!!!
जय महाराष्ट्र