कारण तुझ्यापासुन दुर राहुन मी जास्त दिवस जगणार नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
कारण तुझ्यापासुन दुर राहुन मी जास्त दिवस जगणार नाही लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

बुधवार, २७ फेब्रुवारी, २०१३

प्रेम

यसी :- तुला कित्ती वेळा सांगितले रे सिगारेट ओढत नको जाऊस म्हणून ........... तू ऐकत का नाहीस ?

प्रियकर :- अग ...... सोडण्याचा प्रयत्न करतोय, पण सुटतच नाहीये ...त्यात आपल्या घरचे tension देत आहेत ....लग्नाला नाही म्हणत आहेत .....!!
प्रेयसी :- हे tension मला पण आहे .......... पण म्हणून मी पिते का सिगारेट ?

प्रियकर :- अग मग कसे समजावयाचे ह्या घरच्यांना ......... !!!
प्रेयसी :- अरे म्हणून काय, सिगारेट, दारू, चीडचीडपणा ......हि आपल्या समस्ये वरील औषधे आहेत का ?
प्रियकर :- हे बघ .... उगीच मला lecture देऊ नकोस ...... त्यापेक्षा घरच्यांना कसे समजावयाचे त्याचा विचार कर !!
प्रेयसी :- घरच्यांच्या आधी तुला समजावणे जास्त जरुरीचे आहे ..........
प्रियकर :- म्हणजे ?
प्रेयसी :- चल माझ्या बरोबर ..
प्रियकर :- कुठे ?
(तिथेच शेजारी असणाऱ्या गणपतीच्या मंदिरात ती प्रेयसी त्याला घेऊन जाते ........... मंदिरात आल्यामुळे त्याला सिगारेट फेकून द्यावी लागते, तो नाराजीने हाथ जोडून कपाळावर आठ्या आणून तिच्या बरोबर उभा राहतो)

प्रेयसी हाथ जोडून त्याला ऐकू जाईल अशा आवाजात गणपती बाप्प्पा ला म्हणते :- हे विघ्नहर्ता, ह्याची एक सिगारेट म्हणजे माझ्या आयुष्यातील एक दिवस ........ ह्याप्रमाणे हा जेवढ्या सिगारेट पिल तेवढे माझ्या आयुष्यातील दिवस तू कमी कर ....... हि माझी तुझ्याकडे प्रार्थना, ...... कारण सिगारेट तो पितो पण धूर माझ्या हृदयातून निघतो हे ह्याला कदाचित कधी कळणारच नाही ......!! 

बुधवार, १३ फेब्रुवारी, २०१३

तू खुश तर आहेस ना???


कधी आयुष्यात आलास अन कधी माझी सवय झालास
काही कळलेच नाही..
एक एक दिवस जात होता ..
अन एक एक आठवण
मनाच्या पटलावर तरंगून जात होती ..
कदाचित तुला मी वेडी वाटत असेन..
अन होय मी वेडीच आहे
तुझ्याच साठी.. फक्त तुझ्यासाठी...
तुझ्या एका प्रेमळ कटाक्षासाठी..
तुझ्या प्रेमळ मिठी साठी..
पण कदाचित ते शक्य नाहीये तुला ...
शेवटी मनाला घटत आवळून तुही बुद्धीनेच निर्णय घेतलास ना..!!
आपल ते प्रेम ,
आपल्या त्या आठवणी..
येवढ्या सहज तू विसरू शकशील..?
कदाचित
हो असेल तुझ उत्तर...
पण मनातल्या त्या एकांत कोपरयात
माझी जागा कायम असेल
हेही मी जाणते ..
होईल तुलाही कधी तरी पश्चाताप होईल
कि ऐकल असतं
जर तेव्हाच मनाच तर..???
पण वेळ गेल्यावर काय करणार..
त्यावेळी कोणाला सांगावस वाटल
तरी तुला ते शक्य नाही होणार..!!
आयुष्याच्या एखाद्या वळणावर कदाचित
आपली भेट होईलही ..
पण त्यावेळीही मला हेच जाणून घेण
महत्वाच असेल कि.....
कि
कि
तू खुश तर आहेस ना???
तू खुश तर आहेस ना??? 

बुधवार, १६ नोव्हेंबर, २०११

कारण तुझ्यापासुन दुर राहुन मी जास्त दिवस जगणार नाही

आज तुला मी नको आहे, हे मला ही कळतयं,
तुझ्या बोलण्यातील राग दुखावतोय,
आणि उपासनेने मन जळतय.
एक दिवस असा होता, जेंव्हा तु माझ्या मागुन
फिरायचास
... ...
माझा प्रत्येक शब्द, तु फुलासारखा जपायचास,
मला एकदा बघण्यासाठी, तासन तास वाट बघायचास
डोळ्यात डोळे घालुन माझ्या

स्वतःला त्यात शोधायचास.
पण आज का कोण जाणे, हे सारे बदललय,
माझं असं काय चुकलं की
तुझं माझ्यावरचं प्रेमचं संपलय?

मला जे समजायच ते मी समजली आहे,
आज तुला मी नको आहे,
हे तुझ्या वगण्यावरुन जाणवलं आहे
तरी त्यात तुझं सुख असेल
तर माझी काही हरकत नाही,

तु सुखी होणार असशील तर
मरणाही माझा नकार नाही.
पण तरीही मनात कुठे तरी वाटतयं,
तुला कधीतरी माझी आठवण नक्की येईल,

मला एकदा बघण्यासाठी तुझं मन अतुर होईल
पण तेंव्हा, तुला सावरायला, मी तुला दिसणार नाही,
कारण तुझ्यापासुन दुर राहुन
मी जास्त दिवस जगणार नाही.