बुधवार, २१ ऑगस्ट, २०१३

४ वर्ष कॉलेजचे ..


college चा प्रत्येक क्षण,
प्रत्येक अनुभव वाटला रे नवा.. 
१st year ला आलो तेव्हा वाटले ,
४ वर्ष कधी सरतील रे देवा.. ::)
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा...

college चे पहिले काही दिवस,
अभ्यासाचा दिवस उजाडत नव्हता .. 

कारण मनी घरच्या आठवणीचा पाउस ,
धो-धो पडत होता.. 

हळूहळू रंगी -बेरंगी मित्र झाले , 
तेवढ्यातच EXAM नावाचे सत्र आले,

sac च ओझे घेऊन कोणी देउलात ,
कोणी ग्राथालयात निघाले , ???
तरीही
कोणी YEAROUT, FRONTFOOT
तर कोणी backfoot वर आले , 

तेव्हा मनात लागला,
enGINEERING काय असते याचा रे दिवा, 
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा...


college मध्ये कोणाला मिळतो प्रेम गुच्छ, 
तर कोणी म्हणते प्रेम असते तुच्छ.. ???

तस माझे हि प्रेम फुल फुलले, 
एका फुलावर मनपाखरू जडले, 

२ मनाचे गुलाबी पतंग सजले,
कधी कधी
रुसवा-फुगवाचे नाट्य घडले..  
तरीही शेवटी मनाने,
प्रेमाचे प्रत्येक समीकरण सोडवले.. 

प्रत्येकाला व्हावा वाटतो कोणाचा तरी रे छावा, 
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा.. 


जेव्हा जेव्हा miscall ,sms वाजायची
mobile रिंग , 
तेव्हा आमची स्वारी निघायची,
class To Parking.. 

वेळो-वेळी मदतीसाठी धाऊन आले
मित्र, शिक्षक सगळे , 
खरच college दिवस असतात खूप वेगळे..

अन्न college च्या प्रत्येक वस्तू,वास्तू,
परिवाराशी माझ नात आहे जगावेगळे.. ::)

आठवणीना घेऊन निघालो रे आमच्या गावा, 
आता वाटतंय आयुष्यभर फक्त ,
४ वर्षाच्या आठवणी उरतील रे भावा..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा