मंगळवार, २० ऑगस्ट, २०१३

माझ्या पुरोगामी महाराष्ट्रा.... आता अघोरी पूजेचे सत्र सुरु झालेय...!


अंधश्रद्धा निर्मूलनाचा वसा घेवून
महाराष्ट्राच्या
संतांचा वारसा पुढे घेवून जात
असलेल्या नरेंद्र दाभोळकर
यांच्या गोळी झाडून करण्यात
आलेल्या हत्येने आज
पुरोगामी महाराष्ट्राचा खून झाला. संत
तुकाराम महाराज
ज्या त्यांच्या गाथेतील अभंगात म्हणतात,
‘तीर्थी दगड धोंडा पाणी
देव रोकडा सज्जनी...!!’
आणि ...
‘नवशे कन्या पुत्र होती
तर का करावा लागे पती....!!’
त्याच गाथेचा आज दुसऱ्या मंबाजीकडून खून
झाला....
माझ्या पुरोगामी महाराष्ट्रा....
आता अघोरी पूजेचे सत्र सुरु
झालेय...!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा