गुरुवार, १ ऑगस्ट, २०१३

नजरेची भाषा कळली कि मन कळायला लागत


नजरेची भाषा कळली
कि मन कळायला लागत
अबोल राहिले ओठ
तरी हृदय
समजायला लागत
जाणीवा साऱ्या मनीच्या
डोळ्यात दिसायला लागतात
भावना त्या प्रीतीच्या
काळजाला कळायला लागतात
हृदयात प्रेम उमललय
हृदयाला बरोब्बर कळत
माझं तुझ्यावर प्रेम आहे
 सांगताही कळत
प्रेमाची सुरवात नेहमी
अबोल कशी असते
कळत नाही प्रियेच्या
प्रीत नजरेत कशी दिसते
फक्त ती नजर
वाचता यायला हवी
जी प्रीत आपली आहे
ती ओळखता यायला हवी ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा