शुक्रवार, २१ जून, २०१३

तू आणि मी एक प्रेमळ नाते..


तू आणि मी
एक प्रेमळ नाते
प्रत्येक क्षणी
उलगडत जाणारे

तू आणि मी
शांतते मधले शब्द
न बोलता हि खूप
काही सांगणारे

तू आणि मी
समुद्राचे दोन किनारे
कधी हि भेटू न शकणारे
पण एकमेकांवर जीवापाड
प्रेम करणारे .....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा