"आयुष्याच्या प्रत्येक वळणावर..."
स्पर्शाने ओली तुझ्या
प्रत्येक लाट जगणार मी...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
वाट तुझीच बघणार मी..
सारलस कितीही दूर तू
आपलं तुला मानणार मी...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
वाट तुझीच बघणार मी..
तू विसरलीस जरी
आठवणी तुझ्याच स्मरणार मी...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
वाट तुझीच बघणार मी..
होऊनी वाळवंटी पाखरू
वाट पावसाची बघणार मी...
आयुष्याच्या प्रत्येक वळणावर
वाट तुझीच बघणार मी...
संपला जरी श्वास हा
आत्म्यात तुला जपणार मी...
मिळणाऱ्या प्रत्येक जन्मात
वाट तुझीच बघणार मी...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा