आंध्रप्रदेशची राजधानी हैदराबादमधील दिलसुखनगरच्या बस स्टॅण्डजवळ आणि त्यासमोरील सिनेमा हॉलजवळ स्फोट झाले आहेत. दिलसुखनगरमध्ये झालेले स्फोट प्रचंड शक्तीशाली होते, असं हैदराबाद पोलिसांनी म्हटलं आहे.
या स्फोटात आतापर्यंत पंधरा जण ठार झाल्याचं सांगण्यात येत आहे. घटनास्थळी पोलिसांनी घेराव घातला आहे. स्फोटानंतर या भागातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. परिसरातील घरांच्या काचाही तडकल्या आहेत, एवढा जोरदार हा स्फोट होता.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा