जमल्यास क्षमा कर......
षंढ लोकांनी घेतलेला एक बळी..अनेक यातनांमधून तिची सुटका झाली. अस म्हणतात ह्या देशात जन्माला येण्यासाठी खूप पुण्य असाव लागत पण आता अस वाटत की स्त्री म्हणून ह्या देशात जन्माला येण्यासाठी नक्कीच काहीतरी भयंकर पाप केलेलं असणार..हे कसले रक्षक हे तर भक्षकच...त्या मुलीच्या अनंत यातना पाहताना त्या आई वडिलांची काय अवस्था झाली असेल ? इतक्या प्रेमाने कोड कौतुकाने आपल्या मुलीला मोठ करताना त्यांना हि कल्पनाही नसेल कि पोटाच्या गोळ्याची हि अशी अवस्था पहावी लागेल. हे दुखः फक्त त्यांचच नाही तर अनेक आईवडीलांच आहे ज्यांच्या निरागस निरपराध मुली ह्या असल्या वासनांध लोकांच्या अमानवीय भुकेला बळी पडतात. समाज म्हणून आता तरी जागे व्हा ...फक्त श्रद्धांजली नाही तर अशा सरकार आणि लोकांविरोधात उभे राहा आणि एक सक्षम कायदा करण्यासाठी सरकारला भाग पाडा नाहीतर हि घटनाही विसरून जाल ....हीच त्या मुलीला खरी श्रद्धांजली असेल कि पुन्हा अस कुठल्याही मुलीच्या बाबतीत कधीही घडू नये..
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा