बुधवार, ११ जुलै, २०१२

तुळापूर पुणे जिल्ह्यातील एक गाव आहे. पुर्विचे नाव 'नांगरवास'. त्याला तुळापूर हे नाव कसे पडले त्याचा इतिहास आहे.

इतिहास - शहाजी राजे
आणि आदिलशाही सरदार मुरार जगदेव यांचा तळ
इंद्रायणी आणि भीमा यांच्या काठावर
नांगरगावी पडला होता.मुरार जगदेवास
आपल्या बैठकीच्या हत्तीची तुला करण्याची इच्छा झाली पण
एवढा थोर बच्चा कसा जोखावा याची उकल
मात्र काही केल्या त्याला होईना .मग
शहाजीराज्यांनी पुढं होऊन त्याला तोड
सांगितली.हत्तीच
ा बच्चा भीमा आणि इंद्रायणी यांच्या संगमातील
डोहाच्या नावेत चढविण्यात आला.त्या वजनाने
नाव जेवढी डुबली तेवढ्या जागेवर खुण करून
घेतली.मग बच्चा उतरवून त्या खुणेपर्यंत नाव
डूबेल एवढे दगड धोंडे नावेत चढविले
आणि त्या दगडांच्या भाराइतक सोनंनाणं दान
करण्यात आलं.तेव्हापासून त्या 'नांगरवासास'
'तुळापूर' म्हणतात.
तुळापूर हे गाव भीमा,
भामा आणि इंद्रायणी नद्यांच्या त्रिवेणी संगमावर
वसले आहे. तुळापुर आळंदी पासून साधारण १४
किमी वर, तर पुण्यापासून अंदाजे ३० किमी वर
आहे. येथे संगमेश्वराचे प्राचीन मंदिर आहे.
वढू बुद्रुक आणि तुळापूर
भीमा नदीतीरावरची पवित्र स्थळे . या दोन
गावांना ऐतिहासिक फार महत्व आहे. हीच
ती भूमी जिथे संभाजी महाराजांवर अंतिम
संस्कार झाले. औरंगजेबाने ज्या क्रुरतेने
संभाजी महाराजांचा अंत केला आणि शरीराचे
तुकडे अस्ताव्यस्त भीमेच्या किनारी टाकून दिले,
त्या सर्व इतिहासाची साक्षीदार हि भूमी.
नकळत इतिहासात घेऊन जाणारी हि भूमी
वढू बुद्रुक आणि तुळापूर
या दोनही ठिकाणी संभाजी महाराजांची समाधी आहे.
औरंगजेबाने
जेव्हा संभाजी महाराजांच्या शरीराचे तुकडे
इकडेतिकडे फेकून दिले त्या वेळी प्रत्येक
मराठी माणूस हादरून गेला.
संभाजी राजांचा अंतिम संस्कार रीतीने
व्हायला पाहिजे आशेच सर्वाना वाटत होते. वढू
च्या ग्रामस्थांनी यात पुढाकार घेतला. जीव
धोक्यात घालून, भीमा ओलांडून
आणि मुगली सैन्याला चकवून
त्यांनी संभाजी महाराजांची मिळतील ती अंगे
गोळा केली आणि विधिवत अंतिम संस्कार केला.
असेच तुळापूरलाही घडले.
वढू पासून तुळापूर ५-६ किमी अंतर. रम्य
हिरवा परिसर. तुळापूर
ची संभाजी महाराजांची समाधी हि भीमा –
भामा – इंद्रायणीच्या त्रिवेणी संगमावर. तिथे
बरीच मंदिरे आहेत आणि पुरातन संगमेश्वर मंदिर
तर देखणं आहे. त्रिवेणी संगमावरचा निसर्ग, घाट
पाहण्यासारखा आहे.
इतिहास आणि पर्यटन या दोहोंचा इथे सुरेख
मिलाप झालाय ...... पराक्रमाने , शौर्याने
पावन झालेली हि भूमी आहे. शिवपुत्र
संभाजीची हि भूमी आहे

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा