आयुष्य म्हणजे एक सांजवेळ , नानाचा अंगठा, क्षितिजावरचा सूर्य आणि जिवलग मित्र....
आयुष्य म्हणजे रायगडचे टकमक टोक, अंगाला झोंबणारा गार वारा आणि निस्तब्धता....
आयुष्य म्हणजे मेंगाई देवीच मंदिर, पौर्णिमेची रात्र आणि शाळेतले सवंगडी....
आयुष्य म्हणजे जीवाधानचा कातळकडा,मधेच अडकलेले तुम्ही आणि मित्राने स्वतच्या हातावर पेललेला तुमचा भर....
आयुष्य म्हणजे राजांची समाधी आणि तुमची शून्यातली नजर....
आयुष्य म्हणजे पावनखिंड , हातात उचललेली मुठभर माती आणि डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा....
आयुष्य म्हणजे एक रात्र , चार मित्र , नानेघाटातील गुहा आणि मुगाची गरमागरम खिचडी....
आयुष्य म्हणजे पहाटेची वेळ , कळसूबाईचा पायथा आणि चहाचा मंद सुवास....
आयुष्य म्हणजे नळीची वाट , कोकणकडा आणि तारामती मंदिर....
आयुष्य म्हणजे बालेकिल्ल्यावरचा सूर्योदय, लंगोटी मित्र आणि मित्राने दिलेली "क्षत्रीयाकुलावंत ....." आरोळी....
आयुष्य म्हणजे वासोटा , चुकलेली वाट आणि मावळतीला जाणारा सूर्य....
आयुष्य म्हणजे जंगलातून जाणारी वाट, पानांची होणारी सळसळ आणि कॅमेरा ON करेपर्यंत दिसेनासे होणारे नागराज....
आयुष्य म्हणजे जंगली जयगडचा चढ , पाण्याच्या संपलेल्या बाटल्या आणि घशाला पडलेली कोरड....
आयुष्य म्हणजे माझे शिवराय ....
आयुष्य म्हणजे माझे शंभूराजे ....
आयुष्य म्हणजे माझ्या जिजाऊ ....
आयुष्य म्हणजे माझा सवंगडी हा अफाट सह्याद्री ....

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा