उद्यापासून तुझी नवी सकाळ आहे
कशी सावरशील स्वतःला हा नवा काळ आहे
बंजर जमिन ,पान्हा आटला, इथे थेंबही मिळेना
तीथे मद्यतलावांचा सुकाळ आहे
पिकवूनहि दाणे, अन्नान फिरतो मी
दात टोकरणारा त्यांचा जबडाही विक्राळ आहे
कांद्याने रडवलं, कापसाने नागवलं
काल जो शेतात सापडला ,माझ्या मुलाचा तो कंकाळ आहे
राणी ,काय मिळणार आहे राख चाळून माझी?
खुप आहे आयुष्य , जो गेला तो भूतकाळ आहे
संधीसाधू जन हे लोळती ऐश्वर्यात
भर वैशाखातही शेतात माझ्या ओला दुष्काळ आहे !!
प्रेरणा- अर्थात लांबलेला पाऊस आणि दुष्काळाच्या सावटा खाली असलेला अगतीक शेतकरी !

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा