उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय ..
उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय ..
उठा राजे उठा, बघा रायगड तुमचा विस्कट्लाय
कधी तुमच्या शब्दासाठी जीव देणारा
आज आपल्याच धर्मविरोधा त उठलाय राजे ..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
कट्टर मराठा म्हणता म्हणता
यानी धर्मावरच घाव घातलाय..
चार मतांसाठी तुमचा निश्चयच गाडलाय राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
जाती-पती मोडून राजे धर्म तुम्ही सावरला
हिंदुत्वाची लाट पाहुनी औरंग सुद्धा बावरला
तोच हिंदू सध्या धर्मावरती उठलाय राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
एक नाही कळत राजे हा मराठा का हे विसरलाय
शिवा- न्हावीच काय तर बाजी-तानजीसुद्धा
इथे फक्त मराठा म्हणूनच लढलाय , राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
बाजीराव सुद्धा राजे मराठा म्हणून लढला
घेऊनी वीर मराठे तो थेट दिल्लीला भिडला
तोच बाजीराव आता फक्त एक ब्राम्हण राहिलाय, राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
राजे एवढाच पुरे नव्हतं की काय म्हणून
आज तुमचा इतिहासच यांनी खोटा ठरवलाय
तुमच्या नावाने यांनी आपलाच इतिहास लिहिलाय राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
ब्राम्हण-महार-रामोशी सुद्धा इथे मराठा म्हणून लढले
मुरारबाजी सुद्धा राजे मराठा म्हणूनच पडले
रामोश्यानी गड मराठा म्हणूनच राखलाय, राजे..
आज तुमचा मराठा बघा किती भरकटालाय
काही राजकारन्यांनी हा मतांसाठी डाव आखलाय
तुमच्या नावाखाली राजे लोकशाहीचा बाजार मांडलाय
आणि यांच्या राजकारणाला भोळा मराठा बळी पडलाय, राजे..
आज तुमचा मराठा खरच खूप भरकटालाय
तुम्हीच शिकावा राजे का मराठा कसा घडला
जातीपाती गाडून तो धर्मवेडा कसा ठरला,
इथे कसा तो या माणसासाठी नडला
इथे कसा तो या धर्मासाठी लढला
इथे कसा तो त्या शत्रूला भिडला
इथे कसा तो या मातीसाठी पडला आणि..
इथे कसा तो या स्वातंत्र् यासाठीउडाला राजे..
आज तुमचा मराठा बघा खूप भरकटालाय, राजे..
आज तुमचा मराठा बघा खूप भरकटलाय
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा