बुधवार, ३० मे, २०१२

कॉलेज चे दिवस....


भरभरून जगलेलं आयुष्य.. पुन्हा पुन्हा त्याच आठवणीत रमावं असे दिवस..
कधीच न संपणाऱ्या असंबंध गप्पा, चहाचे कप आणि सामोसे मैत्रीत रंग भरायला..
back बेंच वर बसून टीचर्स वर कॉमेंट्स करणं, मस्ती करणं,
attendance साठी वर्गात यायच..

प्रॉजेक्ट आणि submission च्या दिवसात जागून काढलेल्या रात्री,
भूक लागल्यावर canteen च्या मिसळ चा सहारा..
पार्किंग मध्ये बसून गोस्सिपिंग.. पिरेड बंक करून पाहिलेले पिक्चर..
पेट्रोल वाया जाऊ नये म्हणून tripsy फिरायचं, ते पण style ने..
एकाच नोटबुक मध्ये सर्व विषय, पुढून TCS आणि मागून JAVA ..
सरांनी बोलताना बघून रागावल कि तेवढ्यापुरतं
"sorry सर, next time अस नाही करणार"
न सर गेले कि एकमेकांकडे बघून ते फिदीफिदी हसणं...
विषय back राहिला तर मित्रांचा दिलासा..
आणि जरी All Clear झाला की लाथाबुक्क्याचा मार..

आपल्यातल्या आपल्यात एखाद्याची खूप उडवायची..
पण दुसऱ्या कोणी तसा केला कि मग मित्राच्या बाजूने बोलायचं..
काही लागलं, दुखलं-खुपलं, तर अगदी आईसारखी काळजी घेणार..
मात्र तो बरा झाला कि " किती Ovracting होती यार तुझी .."
एखाद्याची setting(;-) ) लावून देण.
घरच्यांनी मित्राला gf सोबत बघितला तर
" ये बोल, ऐसे बोल" अश्या advice पण देणार..
तास तास फोनवर Bf शी गप्पा मारणार्‍या मैत्रिणी ला खूप त्रास देण..
गरज पडेल तेव्हा मदत करणार..हक्काने मदत मागणार ...
तूच आहेस ..बढती नको मारू ..म्हटल्याशिवाय दिवस पूर्णच व्हायचा नाही..
आणि काही झाल तरी "Partyyyyyyyyyy" हे एकच वाक्य !!!

कॉलेज आणि friends न संपणारे नाते..
आणि काही 'friends तर 'शनीसारखे' राशीला चिकटतात...
पण हे शनी आयुष्यभर साथ देतात..
मधेच सोडून जात नाहीत.. संकटे आली तरी..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा