बुधवार, ३० मे, २०१२

सद्गुरू वामनराव पै यांना विनम्र अभिवादन...!!!!



ज्ञान हाच देव आणि अज्ञान हा सैतान हा जीवनविद्येचा प्रमुख सिंद्धांत आहे....जीवनविद्या आत्म ज्ञानाला जितके महत्व देते तितकेच महत्व विज्ञानाला देत असते....सर्वच माणसे काम करत असतात....परंतु जे योग्य मार्गाने आणि योग्य दिशेने कर्म करतात म्हणजेच प्रवास करतात त्यांनाच सुखी जीवन येते आणि दुःखाचे प्रसंग क्वचित येतात....म्हणून प्रयत्नवाद हा श्रेष्ठ आहे.....

जगातील प्रत्येक माणसाला सुख हेच हवे असते आणि दुःख नको असते...परंतु सुखी होण्याचा मार्ग त्याना सापडत नसतो आणि कोणी दाखवत पण नसतो....पण एक तुम्ही जर कोणाला तरी सुख दिले असेल तर तुम्हाला ते आपोआप मिळते...सुख शोधायची गरज नसते...आणि त्यासाठी तुम्ही काही करायची पण गरज नसते....पण जर तुम्ही तुमच्या वागण्यातुन कोणाला दुःख दिले असेल तर तुमच्या नशिबी सुद्धा दुःखच येणार हे ठरलेले असते...इतराना शांति सुख देणे हाच सुखाचा खरा राजमार्ग आहे...असेच आनंदाचेआहे....तुम्ही जर सर्वाना आनंद वाटून दिलात तर तो तुम्हाला स्वानंद देऊन जाईल ह्यात शंका नाही....

प्रयत्न हे कायम योग्य पद्धतीने केलेले असावेत....आपण प्रवासाला म्हणून बाहेर पडतो...आणि जर का आपण मुक्काम कुठे करायचा हेच जर का माहीत नसेल तर यश आपल्याला मिळते का...???.... नाही ना...त्यामुले सर्वप्रथम ध्येय निश्चिति करायला हवी....आपल्या जीवनाचे ध्येय हे आपणच ठरवले पाहिजे...आणि तिथ पर्यंत आपण कसे पोहोचू हयाचा मार्ग आखणे खूप गरजेचे आहे....ज्ञान प्राप्त करुन केलेले काम हे नक्की आपल्याला आनंद देऊन जाणार ह्यात शंका नाही.....

आपण काम करतो म्हणून काही ठिकाणी आपण चुकतों...हरकत नाही...पण हयातूनच आपण पुढे बरेच काही शिकतो....पण आपण का चूकतो हयाचा पण थोडा अभ्यास करणे गरजेचे आहे....थोडेसे लक्ष दिले तर आपल्याला असे दिसेल की चुका ह्या आपल्या अज्ञान , अहंकार , बेसावधपणा , अंधश्रद्धा हयातूनच होतात....आणि आपण आपली चूक कधी मान्य करत नाही...सारा दोष आपण नशिबावर देतो...पण प्रत्यक्ष तसे काहीच नसते....म्हणून थोडा विचार करा...आपण जर चुका मान्य करून त्यात थोडीशी जरी सुधारणा केली तरी आपण नक्कीच आपल्या जीवनात यशस्वी होऊ.......!!!!

सदगुरु वामनराव पै हयांचा एक सुंदर विचार.......!!

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा