पुरंदरचा वेढा अतिशय त्वेषाने दिलेरने चालू ठेवला होता. तिकडे सिंहगडालाही असाच हलकल्लोळ चालू
होता. दोन महिने उलटून गेले तरीही हे दोन्हीही गड वाकलेले नव्हते. मराठी खेडीपाडी जळत होती.
तरीही मराठी जनता नमण्याची चिन्हेही दिसत नव्हती. दिलेरसारखा संतप्त सेनानी पुरंदर घेण्याची प्रतिज्ञा
करून अक्षरश: अहोरात्र पुरंदरला धडका देत होता.या पुरंदर युद्धात एक महान महाराष्ट्रधर्माचे ब्रीद प्रखर तेजाने प्रकट झाले. दि. १ एप्रिल १६६५ पासूनअहोरात्र दीड महिना पुरंदरगड युद्धात लढत होता. गडाचे नेतृत्त्व"मुरारप्रभू बाजीप्रभू नाडकर उर्फ देशपांडे" या सरदारी तलवारीच्या एखाद्या योध्यासारखे होते. पुरंदराभोवती युद्धतांडव तर चालूच होते १६ मे १६६५ या दिवशी मुरारबाजींच्या मनात एक धाडसी विचार आला. ते धाडस भयंकरच होते. गडावरून सुमारे सहाशे योद्धे सांगाती घेऊनउत्तरेच्या बाजूनने एकदम मोगलांवर अन् खुद्द दिलेरखानवरच तुटून पडायचे असा हा विचार होता. हा विचार की अविचार ? विचारपूर्वक अविचार. एकच वर्षापूवीर् सिंहगडाभोवती
मोचेर् लावून बसलेल्या जसवंतसिंह या मोगली राजपूत सरदारावर सिंहगडच्या मराठी किल्लेदारानं अवघ्या
काहीशे मावळ्यांच्यानिशी असाच भयंकर धाडसी हल्ला गडातून बाहेर पडून चढविला होता. तो पूर्ण
यशस्वी झाला होता. मार खाऊन जसवंतसिंह आणि मोगली फौज उधळली आणि पळून गेली होती.
अगदी तसाच हल्ला करण्याचा विचार आता मुरार बाजीच्या मनात आला होता. तो या जोहारास सिद्ध
झाला. त्याने एकदम दिलेरखानाच्याच रोखाने गडावरून खाली झेप घेतली. भयंकर कल्लोळ उडाला.
वीज कोसळावी तसा दिलेर तर थक्कच झाला. तो आवेश अफलातूनच होता. सहाशे मराठे प्रचंड मोगली
दलावर तुटून पडले होते.
मुरार बाजीचे या आगीतील शौर्यतांडव पाहून खान त्याही स्थितीत विस्त्रित झाला. खुश झाला. त्याने
मुरारवरील मोगली हल्ला स्वत:च हुकूम देऊन हटविला. थांबविला. तो निथळता मुरार खानासमोर काही
अंतरावर झुंजत होता. तो थांबला. दिलेरखानाने त्याला मोठ्याने म्हटले , ' अय बहाद्दूर , तुम्हारी
बहादुरी देखकर मैं निहायत खुश हुँआ हूँ। तुम हमारे साथ चलो। हम तुम्हारी शान रखेंगे! '
हे उद्गार ऐकून मुरारबाजी उलट भयंकरच संतापला. हा खान मला फितुरी शिकवतोय. याचाच त्याला
भयंकर संताप आला. मुरार बाजीने त्याच संतापात जबाब दिला. ' मी शिवाजीराजाचा शिपाई. तुझा
कौल घेतो की काय ?'
आणि मुरार बाजी दिलेरच्या रोखाने तुटून पडला. पुन्हा युद्ध उसळले. खानाने बाण सोडून मुरार बाजीला
ठारही केले. एक महान तेज सूर्यतेजात मिसळले गेले.
हे तेज म्हणजेच महाराष्ट्र धर्माचे तेज.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा