नालायक, निर्लज्ज, नामर्द सरकार सांगतय, संयम राखा ! काही कारण नसताना घराबाहेर पडू नका ! मग काय करू ? घरात बसून राहू ? tv वर बातम्या बघत बसू ? प्रत्येक नेता सांगतोय, या दहशतवाद्यांना कडक शिक्षा व्हायला हवी, मग कसाबला फाशी का नाही झाली अजून ? तो अफजल गुरु सुद्धा अजून बिर्याणी खात बसलाय तिकडे दिल्लीत. का कोणता पक्ष हा विषय लावून धरत नाही ? आहे कुणी असा जो कसाबला आणि त्या अफजल गुरुला फाशी देवू शकेल ? आहे कुणामध्ये हिम्मत ? नुसते साले राजकारण करत बसतात, एकमेकांच्या तंगड्या खेचत बसतात. आता मुंबई मध्ये हे नेते banners लावतील, बघा, बघा मुंबईकरांचे स्पिरीट बघा, अरे कसले स्पिरीट, ज्यांना रॉकेल ओतून जाळायला हवे त्या दहशतवाद्यांना तुम्ही पोसता, आणि आम्हाला संयम पाळायला सांगता ? लाज नाही वाटत ? तुम्ही पोलीस संरक्षणाशिवाय कधी रस्त्यावर फिरत नाही, आणि आम्हाला कसल्या धीराच्या गोष्टी सांगताय ? अरे तुमच्या पेक्षा धीट तर आम्हीच आहोत. आता पुरावे गोळा करा आणि लोणचे घाला त्याचे ! आणि अमेरिकेच्या पायावर लोटांगण घाला, त्यांना सांगा, " अहो बघा ना पाकिस्तान आम्हाला त्रास देतोय, काही तरी करा ना !" कारण कुणाला शिक्षा करायची धमक तुमच्यात नाही हे तुम्ही वारंवार सिद्ध केले आहे. आणि त्याचाच फायदा हे दहशतवादी घेतात. ते म्हणत असतील, "भारत में जाओ, ब्लास्ट करो और भाग जाओ ! पकडे गए तो बिर्यानी खाओ |
..आयुष्याची वाट चालूया सगळ्यांनी मिळूनी , जातील दुखे जळूनी ,जाईल तो त्रासही पळुनी , जेव्हा होईल जड मन अन् वाटेल सांगावेसे काही , या इथे या आपण “आयुष्यावर बोलू काही”
शनिवार, १३ ऑगस्ट, २०११
अफजल गुरु, कसाबला पोसा ! आम्हाला मारा !
याची सदस्यत्व घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा