शनिवार, २५ जून, २०११

सारं आठवतय...

सारं  आठवतय...

आपलं ते  हॉटेलात   जाणतुझा हात  माझ्या  हातात  घट्ट  असणलोकांनी  आपल्या  कडे  पाहणंतुझं लक्ष  मात्र  माझ्याकडे  असण cold drink पीता  पीतामला  ठसका  लागणं"वर  बघ"  म्हणून  तुझं  माझ्या  पाठीवरून  हात  फिरवण सारं  आठवतय

आपण  फिरत  असताना पावसाचही  आपल्या  भेटीला  येणं छत्री  उघडत  असताना   तू  ती  उघडू  न   देणजाऊया  ना  भीझत असं  तुझं  सांगणभिजत   जात  असताना वळणाचा  फायदा  घेत  तुझ्या  डोळ्यांनी  माझ्या  कडे  काही  तरी  मागणं"रस्त्यात" तुला  माझं  ते गमतीनं  विचारणतुझं  तेव्हा  मला  बावळट बोलणसारं  आठवतय

आपल्या  नेहमीच्या  बाकावर  बसणंतिथे  खांद्यवर  डोकं ठेवून  तुझं "देशील  ना  मला  साथ  म्हणून"  नेहमी  डोळ्यात  पाणी  आणून  विचारणंसारं  आठवतय

असच सगळं  अलबेल   चालू  असताना तू  मला  भेटायला  बोलावणं हातात  मेहंदी  डाव्या  हातात  अंगठी पाहून  सगळं  मला  समजणं तरीही  मी  तुला  विचारणं त्यावर  जा  मला  विसरून  म्हणून तुझं  ताडकन  निघून  जाणंसारं  आठवतय

तू  जात  असताना  माझं  तुला  डोळे  भरून  पाहणं त्या  मध्येही  डोळ्यात  पाणी  येणं तुझं  साधं  मागे  वळूनही  न पाहणं सारं  आठवतयसारं  आठवतय...........

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा