शनिवार, २० एप्रिल, २०१३

वहिनीसाहेब

कुळाचे कौतुक जीवांचा आधार
सुखाचे आगर मायेचे माहेर
देह तुळशीचा वसा चंदनाचा
शब्द करुणेचा शोधी ओठांवर
समई होऊन संसारी नांदते
पक्षीण होऊन पिलांना पाहते
गावाची माऊली वडाची सावली
पोळत्या जीवांना पोटाशी धरते
वहिनीसाहेब !

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा