बुधवार, ४ जुलै, २०१२

आजकालच्या लोकांचं "Standard of Living" खूप वाढलं आहे !!!



आजकालच्या लोकांचं "Standard of Living" खूप वाढलं आहे !!!
कोणाच्यातरी तोंडून हे वाक्य ऐकलं अन मला हसावं की रडावं तेच कळेनासं झालं ...

ज्या गोष्टींवरून 'Standard of Living" वाढलंय की कमी झालंय हे ठरवलं जातं त्या संकल्पनाच मला खरं तर अगदी बोथट आणि पोकळ वाटतात ...
लोकांची 'Buying Capacity' वाढलीये म्हणे ...
ह्या अश्या उगाच बडा आव आणणाऱ्या पण मुळात अगदीच अर्थहीन असणाऱ्या शब्दांना माणसं अगदी सहज बळी पडतात ...

'Buying Capacity' ... खरेदी करण्याची क्षमता ...
पैश्याने सगळ्या भौतिक सुखसोयी विकत घेता येतात ...

पण सगळ्याच गोष्टी विकत घेता येतात का ???
सौख्य, शांती, माया, समाधान आणि झोप ... ह्या गोष्टी कुठे विकत मिळतात का ??
अजून तरी नाही !!!

एकीकडे कोणी पचत नाही तेवढं दाबून खातोय तर दुसरीकडे कोणी अर्ध्या पोळीसाठी तरसतो आहे ...
कोणी मऊ गादीवर झोपतोय तर कोणी कडकडत्या थंडीत रस्त्याच्या कडेला पडून राहतोय ...
कोणी 'Convent' शाळा आणि त्यानंतर प्रत्येक विषयाची वेगळी शिकवणी या थाटात शिकतोय ...
तर कोणी फक्त सरकारी 'खिचडी' साठी का होईना पण पालिकेच्या शाळांमध्ये झिजतोय ...

आणि तरीपण आपलं 'Standard of Living' वाढलंय हे मानायचं आपण ??

लोकांना जोपर्यंत आपण फक्त विकत घेणं शिकवत राहू तोपर्यंत हे असंच चालणार ...
खरं सामर्थ्य देण्यात आहे ...

ज्या दिवशी आपल्याला ह्याचा अर्थ कळेल त्या दिवशी आपलं 'Living Standard' आपोआपच वाढेल !!!!

आपल्यातलाच एक

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा