आई आठवताना ...!!
आईला आठवताना
आई आठवते कधीपण ,केव्हाही
मन व्यापून उरलेली
आई असते पाठीवर हात ठेऊन सतत सांभाळून घेणारी
आई असते भक्कम पाठीशी
आधार देऊन ठाम उभी
आई वाटते दगडाहून कठोर
पण मेणाहून मउ
वेळप्रसंगी
पोटच्या पोरांच्या संसारात
रात्रीचा दिवस करणारी
आई फक्त आई असते
तिला आठवताना ती वाटत नाही
कुणाची मुलगी ,सून ,बहीण
नि ईतर नात्यात बांधून घेतलेली
फुलांची पुरचुंडी
आई असते संसाराचा तंबू
एक खांबी
सहज सहन करीत वेदना
मनात निव्वळ
ओंजळभर प्रार्थना
फक्त पोराच्या सुखासाठी
ज्या दिवशी बाबा गेले
तिला बघितलेय मी आभाळभर होताना
नि अश्रू गिळताना
धीटपणे दुखाला सामोरी जाताना
नि तिचे बाबापण होताना ...!!
आईला आठवताना
आई आठवते कधीपण ,केव्हाही
मन व्यापून उरलेली
आई असते पाठीवर हात ठेऊन सतत सांभाळून घेणारी
आई असते भक्कम पाठीशी
आधार देऊन ठाम उभी
आई वाटते दगडाहून कठोर
पण मेणाहून मउ
वेळप्रसंगी
पोटच्या पोरांच्या संसारात
रात्रीचा दिवस करणारी
आई फक्त आई असते
तिला आठवताना ती वाटत नाही
कुणाची मुलगी ,सून ,बहीण
नि ईतर नात्यात बांधून घेतलेली
फुलांची पुरचुंडी
आई असते संसाराचा तंबू
एक खांबी
सहज सहन करीत वेदना
मनात निव्वळ
ओंजळभर प्रार्थना
फक्त पोराच्या सुखासाठी
ज्या दिवशी बाबा गेले
तिला बघितलेय मी आभाळभर होताना
नि अश्रू गिळताना
धीटपणे दुखाला सामोरी जाताना
नि तिचे बाबापण होताना ...!!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा