सोमवार, १८ जून, २०१२

मी मोर्चा नेला नाही


मी मोर्चा नेला नाहीमी मोर्चा नेला नाहीमीसंपही केला नाहीमी निषेध सुद्धा साधाकधी नोंदवलेला नाही

भवताली संगर चालेतो विस्फ़ारुन बघतानाकुणी पोटातून चिडतानाकुणी रक्ताळून लढतानामी दगड होउनी थिजलोरस्त्याच्या बाजूस जेव्हातो मारायाला देखिलमज कुणी उचलले नाही

नेमस्त झाड मी आहेमूळ फ़ांद्या जिथल्या तेथेपावसात हिरवा झालोथंडीत झाडली पानेपण पोटातून कुठलीहीखजिन्याची ढोली नाहीकुणी शस्त्र लपवले नाहीकधी गरूड बैसला नाही
धुतलेला सातिव सदरातुटलेली एकच गुंडीटकलावर अजून रुळतेअदृश्य लांबशी शेंडीमी पंतोजींना भ्यालोमी देवालाही भ्यालोमी मनात सुद्धा माझ्याकधी दंगा केला नाही
मज जन्म फ़ळाचा मिळतामी केळे झालो असतोमी असतो जर का भाजीतर भेंडी झालो असतोमज चिरता चिरता कोणीरडले वा हसले नाहीमी कांदा झालो नाहीआंबाही झालो नाही

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा