शनिवार, ९ जून, २०१२

देवा, मला रोज एक अपघात कर



देवा, मला रोज एक अपघात कर

आणि तिच्याच हातांनीच ...
आणि तिच्याच हातांनीच ...जखमा या भर

देवा, मला रोज एक अपघात कर ..देवा, मला रोज एक अपघात कर ..


कधीतरी कुठे तरी बसावी धडक 
कळ मला यावी तिला कळावी तड़क
घायाळाला मिळो एक घायाळ नजर.. हाय ..
देवा, मला रोज एक अपघात कर

अपघाती सोंग माझे वाटावे खरे
तिला येता प्रेम मला वाटावे बरे
दवा दारू मधे .. कुठे असतो असर
देवा, मला रोज एक अपघात कर

खरी व्यथा तेव्हा मग सांगेन तिला
विचारेल जेव्हा, कुठे दुखते तुला?
जरा डावीकडे.. जरा पोटाच्या या वर
देवा, मला रोज एक अपघात कर

टेकवता छातीवर डोके एकवार
ठोका घेई झोका, उडे आभाळाच्या पार
व्यथांचाच काय, पड़े जगाचा विसर
देवा, मला रोज एक अपघात कर

देवा, मला रोज एक अपघात कर

आणि तिच्याच हातांनीच जखमा या भर
देवा, मला रोज एक अपघात कर ..

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा