आचार्य अत्रेंचा एक किस्सा
एकदा आचार्य अत्रे विधानसभेत निवडून आले होते; मात्र ते विरोधी पक्षात होते. सत्ताधारी काँग्रेसचे संख्याबळ विरोधकांपेक्षा बरेच जास्त होते. अत्रे मात्र एकटे सरकारवर तुफान हल्ला चढवीत असत.
एकदा अत्रे ग्रामीण भागाच्या दौर्यावर असताना पत्रकारांनी त्यांना छेडले. “अत्रेसाहेब, तुम्ही विधानसभेत सरकारला बरोबर कोंडीत पकडता खरे; पण त्यांच्या एवढ्या संख्याबळापुढे तुम्ही एकटे कसे पुरणार?”
बाजुला वळून अत्र्यांनी ज्याच्या शेताला भेट द्यायला ते आले होते त्या मालकाला विचारले, “बळवंतराव, कोंबड्या पाळता की नाही?”
“व्हय तर!”
“किती कोंबड्या आहेत?”
“चांगल्या शंभरएक कोंबड्या हायेत की!”
“आणि कोंबडे किती?”
“कोंबडा फक्त एकच हाये.”
”एकटा पुरतो ना?”
उपस्थितांमध्ये प्रचंड हशा उसळला आणि सर्व पत्रकारही त्या हशांत सामील झाले.
आज त्यांचा स्मृतिदिन...
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा