शनिवार, १९ मे, २०१२

बाप हा बाप च असतो..

उमललेल्या फुलाला सगळेच गोंजारतात

संरक्षण कर्त्या देठाला मात्र सारेच विसरतात.....

 
मुलालाही बापाच्याच नावे ओळखतात

जन्मदात्या बापाला मात्र

मुलेच विसरून जातात

मुलांना जपतो तो, 

मुलाचं सगळाच करतो तो

आईलाही सावरतो तो, 

रुसवे फुगवे हि काढतो तो

काबाड कष्ट करता करता

कधी कधी एकट्यानेच रडतो तो

रागीट डोळ्यांमागे प्रेमाचा झरा ठेवतो तो

आईलाही लाजवेल इतके 

आशीर्वाद देतो तो

जास्त बोलत नाही म्हणून कठोर नसतो तो

न बोलता हि बरच काही सांगून जातो तो

आपल काहीच नाही म्हणत

मुलांनाच सगळे देतो तो

मुलांनी घरातून काढता वृद्धाश्रमात राहतो तो

तरीही हसतो,सर्वांना आशीर्वाद देतो

कोणाला काहीही न सांगता एके दिवशी मग

गुपचूप निघून जातो तो ......

गुपचूप निघून जातो तो ......

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा