शुक्रवार, ५ ऑगस्ट, २०११

यात काही चुकले का रे माझे.....................?​?????

"कसा आहेस ?खूप दिवस झाले तुझ्याशी बोलली नाहीये रे....
आवाज तुझा ऐकायला माझे पण कान तरसले आहेत रे......"
मला काहीच फरक पडला नाहीयेय असे तुला वाटत असेल ना?
पण तुझ्या इतकेच माझे पण डोळे बरसले आहेत रे...."

"माझ्या प्रत्तेक छोट्या छोट्या गोष्टीत होतास तू,
माझ्या प्रत्तेक स्वप्नात होतास तू,
खूप भिजला असशील ना माझ्या आठवणींच्या पावसाने?
माझ्याही गालावरून रोज घरंगळलायस तू".

सुरूवात झाली तेव्हा आपण खूप खूप बोलायचो,
लपले नव्हते काहीच,एकमेकांसमोर मनाचे दरवाजे खोलायचो,
रागवण्यात आणि मनवण्यात मजा होती वेगळी,
आयुष्याची स्वप्न रंगवण्यात अक्खा दिवस घालवायचो.

खांद्यावर तुझ्या डोके ठेवून समुद्राच्या लाटा किती सुंदर वाटायच्या,
हाताने माझा हात धरलास कि,मनात संसाराच्या कल्पना थाटायच्या,
काळजीने जरी ओरडलास तरी माझ्या अश्रुधारा सुटायच्या,
पावसाच्या सरी मला तुझ्या सारख्या भेटायच्या.

शिक्षण संपले अन तुला नोकरी लागली,
तेव्हाच बहुतेक आपल्या नात्याला कुणाची तरी नजर लागली,
तुझ्यावरच्या प्रेमाची माझी तहान अजून नव्हती रे भागली,
विश्वास कर माझा, मी मुद्दाम नाही रे अशी वागली.

तुझ्या नोकरीनंतर खूप काही बदलले,
तासन तास चालणारे फोन मिनिटामध्ये घसरले,
एकटेपणा हळू हळू माझ्या अंगवळणी पडला,
आपल्या प्रेमाचा बंगला त्या एकांतात दडला.

दिवसा वेळ नाही म्हणून आपले रात्री विषय निघायचे,
दमलेल्या तुझे डोळे बोलता बोलता निजायचे,
जागा आहेस असे मानून मग मी एकटीच बडबडायचे,
सांगून झाले कि माझे डोळे थोडेसेच पण..... नक्की भिजायचे.

दमले होते रे मन त्या एकटेपणाला,
तुझ्या जवळ राहून सुद्धा आलेल्या एकांताला,
तरसले होते रे तुझ्या सहवासाला,
कंटाळले होते तू आहेस सोबत अश्या त्या भासाला.


अडकवून ठेवायचे नव्हते,म्हणून मोकळे केले मी तुला,
विसरताना खूप त्रास होईल पण जमले माफ कर मला,
खूप चांगला आहेस तू, उंच उंच भरारी घेशील,
येईल कोणीतरी नवीन तुझ्या आयुष्यात तिला स्वर्गसुख देशील.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा