मुंबई आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याने हादरली. दादरमधील कबुतरखाना, झवेरी बाजार आणि ऑपेरा हाऊस या तीन ठिकाणी लगोपाठ साखळी स्फोट झाल्यामुळे मुंबई पुन्हा एकदा हादरली आहे. संध्याकाळी 6 वाजून 54 मिनिटं, 6 वाजून 55 मिनिटं आणि 7 वाजून 05 मिनिटांनी हे स्फोट झाल्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले आहे. त्यात 18 जणांचा मृत्यू झाला. तर 100 जण जखमी झाले आहे. पहिला स्फोट दक्षिण मुंबईतल्या झवेरी बाजारातल्या खाऊ गल्लीत झाला. दुसरा स्फोट ऑपेरा हाऊस इथं तर तिसरा स्फोट दादरमधील कबुतरखाना इथं झाला.
दादरमधला स्फोट एका एस्टीम गाडीत झाला.MH 43 A 9384 या क्रमाकांच्या एस्टीम गाडीत हा स्फोट झाला आहे. या स्फोटात तीव्रता इतकी होती की गाडीचा चक्काचूर झाला. स्फोटात जखमी झालेल्यांना जे. जे. हॉस्पिटल, नायर, सेंट जॉर्ज आणि केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. दादरमधील स्फोटातल्या जखमींना केईएम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हे सीरियल ब्लास्ट असल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
स्फोटात IED चा वापर करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. एटीएसचे पथक स्फोटाच्या ठिकाणी पोचलंय. बीएएफचं विशेष विमान केंद्राने मुंबईकडे पाठवलं आहे. त्याच्यासोबत बॉम्बशोधक पथक आणि फॉरेन्सिक एक्सपर्ट्सची टीमसुद्धा आहे. स्फोटानंतर मुंबई आणि दिल्लीसह संपूर्ण देशभरात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.
पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बातचीत केली. त्यांनी जनतेला शांत राहण्याचे आणि अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आवाहन केलं. तसेच मुंबईत सायंकाळी झवेरी बाजार, ऑपेरा हाऊस आणि दादर येथे झाले स्फोट हा दहशतवाद्यांनी घडवून आणला आहे. दहशतवाद्यांनी पुन्हा मुंबईवर हल्ला केला आहे. दहशतवाद्यांचे हे कृत्य निंदनीय आहे. या हल्ला मुंबईवर नाही तो देशावर झाला आहे. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेऊ नका असं आवाहन ही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा